घरताज्या घडामोडीपोलीस भरती परीक्षेतील अपयशाने तरुणाची आत्महत्या

पोलीस भरती परीक्षेतील अपयशाने तरुणाची आत्महत्या

Subscribe

उपचार सुरू असताना रविवारी झाला मृत्यू

नवीन नाशिक : पोलीस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल भानुदास चौगुले (वय 22, रा . एक्सलो पॉईंट, अंबड)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल याने गत आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या भरतीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. तो राहुलने ऑनलाइन बघितला असता त्यात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला होता. मनापासून सर्वतोपरी लेखी व मैदानी परीक्षेची तयारी कमी गुण मिळाल्याने त्याची मानसिकता खालावली. त्याने शनिवारी (दि.२०) रात्री विषारी औषध सेवन केले. त्याला त्रास सुरू झाल्याने भानुदास चौगुले यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि.२१) सकाळी मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -