वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील घटना

one killed and three kids injured by lightning as they climbed a tree in search of a mobile network at palghar

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वळवाचा पाऊस झाला. या दरम्यान सामुंडी येथे झाडावर वीज कोसळली. झाडाजवळ लहामटे यांचे घर असून घराजवळ उभ्या असलेल्या आई रंजना वसंत लामटे (वय ४५), त्यांच्या तीन मुली अपेक्षा (१४ वर्षे), अक्षरा (११ वर्षे), छाया (९ वर्षे) या तीन मुली व मुलगा ऋषी (४ वर्ष) यांना जवळच्या झाडावर पडलेल्या वीजेचा झटका बसला व हे सर्व बेशुद्ध झाले.

सर्वांवर त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मंगळवारी दुपारी झालेल्या पावसात वीज पडल्याने ञ्यंबक तालुक्यातील चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे (वय 38) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत रामू हा रानात गुरे चारत असतांना वीज कोसळली.तसेच अंबई येथील सुनील बाबूराव भुतांबरे यांच्या 10 शेळ्या गावाजवळच माळरानावर चरत असतांना वीज पडून ठार झाल्या. गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे. तहसीलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड,सतीश निकम यासह मंडळ अधीकारी हेमंत कुलकर्णी, रोकडे यांनी तालुक्यातील माहिती घेत नुकसानीचे अंदाज घेत आहेत.