घरमहाराष्ट्रनाशिकतरुणांनी नवनवीन कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करावे - अतिरिक्त आयुक्त नीलेश सागर

तरुणांनी नवनवीन कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करावे – अतिरिक्त आयुक्त नीलेश सागर

Subscribe

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त केले मार्गदर्शन

आजचे शिक्षण आणि उद्योगांना लागणरी कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यामुळे रोजगार उपलब्ध असतांनाही प्रत्यक्षात मिळत नाही आणि शिक्षण असूनही उमेदवार बेरोजगार राहतात. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे असे आवाहन अतिरीक्त जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

परशुराम सायखेडकर नाट्यगृहात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यांत आले होते. या कार्यक्रमात नाशिक जिल्हयामध्ये रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करणा-या अनुक्रमे तीन उद्योजक, नियोक्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक डेटामॅट्रिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि, व्दितीय क्रमांकएमएसएल ड्राईव्हलाईन सिस्टिम लि आणि तृतीय क्रमांक महिन्द्रा अँड महिन्द्रा लि यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय योजना 2018-19 मध्ये निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

- Advertisement -

यामधील सई ट्रेनिंग सेंटरच्या उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप केले. सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नाशिक पंतप्रधान कौशल्य केंद्राच्या व्यवस्थापक अनुश्री सोनवणे, जनशिक्षण संस्थानचे संचालक प्रकाश नाठे, निवासी प्रशिक्षण देणार्‍या व्यवसाय प्रशिक्षण संस्थांचे संचालक आणि जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी अशोक चव्हाण, कौशल्य विकासचे उपसंचालक सुनील सैंदाणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -