घरमहाराष्ट्रनाशिकट्रेलर-दुचाकी अपघातात तरुण ठार; दोघे जखमी

ट्रेलर-दुचाकी अपघातात तरुण ठार; दोघे जखमी

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहराजवळील शनिमंदिराकडे जाणार्‍या वळणावर शुक्रवारी (दि. ४) ट्रेलर-दुचाकी अपघातातील जखमी झालेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा रविवारी (दि. ६) उपचारा -दरम्यान मृत्यू झाला.

चांदवड-येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील शहराजवळील शनिमंदिराकडे जाणार्‍या वळणावर शुक्रवारी (दि. ४) ट्रेलर-दुचाकी अपघातातील जखमी झालेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा रविवारी (दि. ६) उपचारा -दरम्यान मृत्यू झाला. मालेगावकडून नाशिककडे जेसीबी व रोलर घेऊन जाणार्‍या अवजड ट्रेलरने (आरजे- ०९- जीडी- १५९७) शुक्रवारी (दि. ४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गावर मौनगिरी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर शनिमंदिराकडून महामार्गाकडे जाणार्‍या वळणावर हिरो होंडा सीबीझेड दुचाकीला (एमएच- १५- डीएच- ६२८६) धडक दिली होती. अपघातात दुचाकीवरील राहुल भाऊसाहेब सानप (वय. १७), प्रज्वल प्रकाश वाघ (वय. १७), शुभम नवनाथ चारोळे (वय. १६, तिघे रा. चांदवड) हे दुचाकीसह महामार्गालगतच्या ओहोळात फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते.

उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले उपचार

तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन राहुल भाऊसाहेब सानप यास पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. व तेथून नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तथापि उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यास चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान रविवारी (दि. ६) दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुल सानप याचा मृत्यू झाला. तर उर्वरीत दोघे प्रज्वल वाघ व शुभम चारोळे यांच्यावर आडगाव (नाशिक) येथील मविप्र रुग्णालयात उपचार करुन त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -