घरक्राइमआत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

Subscribe

पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ बनवत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील भीमनगर परिसरात घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडियो तयार केला असून भद्रकाली पोलिसांनी त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख व्हिडियोत केला आहे. या तरुणावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकारांमुळे पोलीस आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -