घरउत्तर महाराष्ट्र'डिजे'च्या तालावर तरुणाई थिरकली; तब्बल १३ तास चालली नाशिकची विसर्जन मिरवणूक

‘डिजे’च्या तालावर तरुणाई थिरकली; तब्बल १३ तास चालली नाशिकची विसर्जन मिरवणूक

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या दहा दिवस गणेशोत्सवा निमित्त चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या दिवसापर्यंत हा उत्साह शिगेला पोहचला होता. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पारंपरिक मिरवणुकीला सुरवात झाली होती. वाकडी बारव येथे मानाचा पहिला गणपती अर्थात नाशिक महानगर पालिकेच्या गणपतीची पुजा करून आणि नारळ वाढवून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. यंदाच्या वर्षी सर्व मंडळे आणि प्रशासनाच्या एकमताने सकाळी ११ वाजताच मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदा जवळपास 23 सार्वजनिक मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

सकाळी मिरवणूक सुरु झाल्यापासूनच मिरवणूक मार्गावर नाशिककरांची गर्दी पाहायला मिळत होती. मिरवणूक जशी पुढे सरकत होती, तस तस नाशिककरांचा उत्साह वाढत होता. मिरवणुकीवर पावसाचे सावट होते, मात्र शेवटपर्यंत पाऊस काही बरसला नाही. पावसाचा व्यत्यय न आल्याने गणपती बाप्पाचा विसर्जनाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री एक वाजेपर्यत मिरवणूक शांततेत सुरु होती. शेवटी एकच्या ठोक्याला मिरवणूक बंद झाली. पोलिसांच्या सूचनेनुसार मंडळांनी ढोलवादन, डीजे बंद करून शांततेत विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या क्रमानुसार अकरा वाजेला मिरवणूक सुरु झाली. यानंतर सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पहिला मानाचा महापालिकेचा गणपती गंगाघाटावर विसर्जन करण्यात आले, तब्बल नऊ तासांनी पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. किरकोळ वाद वगळता शांततेत लाडक्या गणरायाला नाशिककरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी गोदाघाटांसह विसर्जन मार्गावर प्रचंड संख्येने नाशिककरांची उपस्थिती पाहायला मिळाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत गणरायाला साश्रू नयनांनी नाशिककरांनी निरोप दिला.

डिजेमुळे आली रंगत

यंदा, आवाजाची मर्यादा ठेऊन डिजेला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे, नाशिककरांची आणि विशेषतः तरुण वर्गाची मिरवणुकीत मोठी गर्दी बघायला मिळाली. मोठ्या मंडळांनी डिजेची परवानगी मिळताच अवघ्या काही तासात आपले कार्यकर्ते आणि नाशिकरांसाठी डिजेची व्यवस्था केली. पुढे ढोल पथक त्यामागे डिजे त्यामागे गणपती बाप्पाचा आरास देखावा यामुळे मोठे मंडळांची मिरवणूक तब्बल ५०० मीटर पर्यंत जागा घेत होती. दरम्यान, सकाळी अकरा वाजेला सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशीरापर्यंत सुरु होता. मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी गणपती विसर्जित झाले. साधारण एक वाजेपर्यंत सर्व मिरवणूक आटोपून गणेश विसर्जन पार पडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -