घरमहाराष्ट्रनाशिकजि.प. : शाळांचे आज फेरसर्वेक्षण

जि.प. : शाळांचे आज फेरसर्वेक्षण

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळांच्या सर्वेक्षणात चुक झाल्याचे मान्य करत प्रशासनाने आता फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकार्‍यांची मंगळवारी (दि.13) तातडीने बैठक बोलवली आहे.

नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.12) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले. प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत सद्यस्थितीत निश्चित केलेल्या अवघड व सोपे क्षेत्र यादी सदोष असून त्यात अनेक अवघड गावे वगळण्यात आली आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार करून त्या यादीत बदल करण्याची आवश्यकता आहे. शासन निर्णयातील निकषानुसार वास्तव परिस्थिती समजून घेऊन पडताळणी सुनावणी इत्यादी घेऊन बदल करण्याची मागणी या शिक्षकांनी केली. अनेक गावे निकषात बसत असताना वगळण्यात आलेे आहेत. वास्तवतेचा विचार करून दुरुस्ती करण्याची मागणी या शिक्षकांनी केली. आमदार खोसकर यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जून ताकाटे, जिल्हा सरचिटणीस धनराज वाणी, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्यकोषाध्यक्ष अनिल बागूल, शिक्षक संघाचे राज्यउपाध्यक्ष प्रदीप शिंदे, तालुकाध्यक्ष प्रदीप पेखळे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बोढारे, आदिवासी संघटना जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत लाहंगे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनीत झोले स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

आज काय होणार ?

नाशिक जिल्ह्यातील एकूण 3 हजार 262 शाळांपैकी 536 शाळा या अवघड क्षेत्रात असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. याविषयी शिक्षकांचा आक्षेप असल्याने ज्या ठिकाणी शिक्षकांनी वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत, त्या शाळांचे निकष प्रथमत: तपासले जातील. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण व सुरगाणा या तालुक्यातील शाळांचे फेरसर्वेक्षण करुन शिक्षणाधिकारी त्यासंदर्भातील अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुपुर्द करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -