घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाच प्रकरणात अखेर झनकरांना जामीन मंजूर

लाच प्रकरणात अखेर झनकरांना जामीन मंजूर

Subscribe

न्यायालयाच्या अटी व शर्तीसह २५ हजारांचा बॉण्ड

शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी आठ लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अखेर १३ दिवसांनी सोमवारी (दि.2२) जिल्हा न्यायालयाने अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला. तसेच, न्यायालयाने झनकर यांना २५ हजार रुपयांचा बॉण्ड व आठवड्यातून एक दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर लावण्याची अट घातली आहे.

शिक्षण संस्थेच्या एका प्रशासकीय कामाच्या मंजुरीसाठी नऊ लाखांच्या लाचेची मागणी करून आठ लाखांची रक्कम स्वीकारल्याचा झनकर यांच्यावर आरोप आहे. १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाण्याच्या पथकाने लाचप्रकरणी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना अटक केली होती. त्याच दिवशी रात्री डॉ. झनकर यांचा पथकाने जबाब घेत सोडून दिले जाते. त्यानंतर त्या दोन दिवस फरार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना पथकाने अटक करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत चौकशी करण्यासाठी डॉ. झनकर यांच्या पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्या आजारी असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या. पथकाने चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने कोठडीत वाढ केली होती. दरम्यान, डॉ. झनकर यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीही प्रलंबित राहिली होती. गत शुक्रवारी (दि.२०) तांत्रिक कारणामुळे सुनावणी होऊ शकली नाही. ही सुनावणी सोमवारी पार पडली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सचिन धोरवडकर यांनी जामीन अर्जास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने डॉ. झनकर यांना अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -