घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा बँक ऑडिओ क्लिप प्रकरण : कारवाईच्या धाकाने चेहरा झाकून रिकामे केले...

जिल्हा बँक ऑडिओ क्लिप प्रकरण : कारवाईच्या धाकाने चेहरा झाकून रिकामे केले पिंगळे, पाटलांचे लॉकर

Subscribe

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या निधीतील अपहार प्रकरणाची ऑडिओ क्लिप ‘माय महानगर’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा बँकेत एकच खळबळ उडाली. या ऑडिओ क्लिपमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आणि तत्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे वादग्रस्त पीए वाय. के. पाटील यांचे धाबे दणाणले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा फास अडकण्याच्या भितीने या दोघांनी बँक लॉकरमधील सर्व घबाड काढून नेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतरही मालमत्तेची विल्हेवाट त्यांनी लावल्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खरेचे खोटे कारनामे या मालिकेखाली ‘माय महानगर’ने खरेशी संबंधित अनेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गटसचिवांच्या निधीचा अपहार सतीश खरेशी संबंधित असल्याने या प्रकरणाला ‘माय महानगर’ने वाचा फोडली. या गंभीर प्रकरणाची संशय वाढवणार्‍या संभाषणाची ऑडिओ क्लिप ‘माय महानगर’च्या हाती आल्यानंतर त्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी शैलेश पिंगळे आणि वादग्रस्त पीए वाय. के. पाटील यांचे धाबे दणाणले. या क्लिपमधील आवाज या दोघांचाच असल्याने कारवाई ही अटळ आहे, या भीतीने दोघांनी सर्वप्रथम जिल्हा बँकेतील लॉकरमधून सर्व ‘घबाड’ काढून घेतले. हे घबाड काढण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नींनी आपला चेहरा क्लोज सर्किट कॅमेर्‍यांमध्ये येणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली होती. संपूर्ण चेहरा झाकून त्यांनी लॉकरमधील पैसे काढल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

या प्रकरणी काही संचालकांच्या संभाषणांच्या ऑडिओ क्लिप ‘माय महानगर’च्या हाती लागल्या आहेत. त्यानुसार काही संचालकांचा देखील या अपहारात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाल्यास जिल्हा बँकेतील झारीतले शुक्राचार्य’ पुढे येतील.

चेहरा झाकून लॉकर उघडायला परवानगीच कशी मिळाली?

सर्वसामान्यांना लॉकरमधून पैसे काढायचे असतील तर अनेक नियमांना सामोरे जावे लागते. त्यातील महत्वाचा नियम म्हणजे, चेहरा झाकून लॉकर उघडता येत नाही, जेणेकरुन अन्य कुणी लॉकरचा गैरफायदा उचलणार नाही. या नियमाला बगल देत चक्क चेहरा झाकून पैसे काढण्याची परवानगी जिल्हा बँकेच्या प्रशासनाने दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यवस्थापकांच्या पत्नींना जर अटी- शर्थीमधून सुट मिळत असेल तर जिल्हा बँकेचा कारभार कसा पारदर्शक राहणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -