घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा परिषदच्या सहायक अभियांत्रिकी गायत्री पवार निलंबित

जिल्हा परिषदच्या सहायक अभियांत्रिकी गायत्री पवार निलंबित

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेत फाईल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करणारी बांधकाम विभाग दोनमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गायत्री पवार चौकशीत दोषी आढळली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पवारांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयेश अहिरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाच दिवसांपूर्वी गायत्री पवार विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी सीईओ बनसोड यांनी सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे, लेखा व वित्त विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी संदीप गावंडे व बाळू झिरवाळ यांची नियुक्ती केली. त्यांनी शुक्रवार (दि.12) रोजी चौकशी अहवाल सीईओ बनसोड यांच्याकडे सुपुर्द केल्यानंतर त्यानुसार गायत्री पवार या जागेवर नसतात, भेटल्या तरी वेळेवर काम करत नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारींमाध्ये तथ्य आढळले आहे. तसेच कामाचे पैसे ऑनलाईन मागवल्याचे ‘स्क्रीन शॉट’ काही ठेकेदारांनी सीईआेंना पाठवले आहेत. त्यानुसार एक ते दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार झाल्याचे दिसून येते. याव्यतिरीक्त ठेकेदार यांच्याशी उध्दटपणे बोलणे, अरेरावी करणे, कामावर उशीराने येणे, सहा वाजेच्या आता निघून जाणे, बायोमेट्रीक हजेरी न लावणे, ठेकेदारांच्या फाईली अडविणे आदी तक्रारींचा समावेश आहे. एवढ्या सगळ्या तक्रारी असताना सीईओ बनसोड यांनी थेट कारवाई करण्याऐवजी चौकशी समिती नियुक्त केली. समितीचा अहवाल आल्यानंतर आता निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे.
प्रशासनाची बोटचेपी भूमिका

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका ठेकेदाराच्या हातात फाईल दिसली म्हणून सीईओ लीना नबसोड यांनी संबंधित विभागातील क्लर्कला तडकाफडकी निलंबित केले होते. तर एका शाखा अभियंत्यास मूळ जागेवर ठेवण्यासाठी आमदाराने फोन केला म्हणून त्याच्यावरही कारवाई करण्याची तत्परता दाखवणार्‍या सीईओ बनसोड यांनी पवार यांच्या बाबतीत बोटचेपी भूमिका का घेतली याविषयी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे पवार यांनी दोन दिवसांच्या रजेचा अर्ज देवून पसार झालेल्या आहेत. त्यांच्या रजेचा अर्ज विभागप्रमुखांनी कसा मंजूर केला याविषयी शंका उपस्थित होते. शिवाय जाण्यापूर्वी त्यांनी प्रलंबित काम दोन दिवसांत पूर्ण केले. दरम्यान, काही ठेकेदार शुक्रवारी सीईओ बनसोड यांची भेट घेण्यासाठी आले होते मात्र होऊ शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -