Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक जिल्हा परिषद मुख्यालय की भंगार गोदाम?; ना सीईओंचे लक्ष, ना अधिकार्‍यांना पर्वा

जिल्हा परिषद मुख्यालय की भंगार गोदाम?; ना सीईओंचे लक्ष, ना अधिकार्‍यांना पर्वा

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेत इमारतीच्या डाव्या बाजुकडील येण्या जाण्याच्या रस्त्यावर कृषी विभागाच्या समोर ठेवण्यात आलेले लोखंडी जाळ्यांचे गेट, जिल्हा परिषद संघटनांचे ठेवलेले जुने लोखंडी फळे, गंज चढलेली जुनी कपाटे यामुळे जिल्हा परिषदेला दिवसेंदिवस भंगाराच्या गोदामाचे स्वरुप प्राप्त होत आहे. या समस्येकडे कुणाही अधिकार्‍याचे लक्ष नाही यामुळे ना सीईआेंचे लक्ष ना अधिकार्‍यांना पर्वा अशी स्थिती सध्या जिल्हा परिषदेची झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या इमारतीची डागडुजी अन रंगकाम करण्यासाठी 47 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र भिंतीना वॉटर पेपरने न घासता कलर देण्यात आला. इमारतीच्या जिन्यांच्या तुटलेल्या फर्च्या तशाच ठेवून पायर्‍यांची डागडुजी न करता केवळ भिंती रंगविण्यात आल्या. यामुळे 47 लाख रुपये खर्च करुन जिन्यांमध्ये पानाच्या थुंकलेल्या जागा, तुटलेल्या फर्च्या असे इमारतीचे आेंगळवाणे स्वरुप आजही आहे त्याच स्वरुपात आहे.

रंगकामाची पाहणी करण्यास अधिकारी उदासीन

- Advertisement -

जिल्हा परिषदेमध्ये रंगकाम अन डागडुजी करतांना अनेक ठिकाणी त्रुटी आढळुन येतात. मात्र रंगकामाची पाहणी करणार्‍यासाठी नेमलेल्या अधिकार्‍यांला इमारतीची पाहणी करण्याची तसदी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. आता आवश्यकता का वाटत नाही याचे कायद गुलदस्त्यातच आहे. यामुळे जनतेचा पैसा कसाही वापरला तरी कुणीही विचारत नाही अशी खात्रीच एकप्रकारे अधिकार्‍यांना झाली आहे.

४७ लाख खर्चूनही इमारतीच्या नशीबी दूर्दशाच

जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीसाठी अन रंगकामासाठी 47 लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र 47 लाख खर्चुनही इमारतीच्या नशिबी दुदैवच आले आहे. आज ना उद्या अधिकारी बदलुन जातील मात्र एवढे पैसे खर्च करुन इमारतीची स्थिती जैसे थे च राहणार असल्याने जिल्हा परिषद इमारतीच्या नशिबी दुर्दैवच आले असेच म्हणावे लागेल.

अधिकार्‍याचे नियंत्रण नाही का

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरवाजातच चक्क भिंतीच्या तुटलेल्या फर्च्या असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे रंगकामासाठी नेमलेल्या ठेकेदारावर कुणाही अधिकार्‍याचे नियंत्रण नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisment -