Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक 'झेडपी'च्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला; वेळापत्रक जाहीर

‘झेडपी’च्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला; वेळापत्रक जाहीर

Subscribe

नाशिक : गत दोन महिन्यापासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे रखडलेले वेळापत्रक अखेर सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सीईआेंकडे पाठविलेल्या फाईलला मंजुरी मिळाली असून त्यानुसार 16 मे ते 19 मे दरम्यान बदल्यांची प्रक्रियेची भाकरी फिरविली जाणार आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र आदिवासी व बिगर आदिवासीतील अनुशेषामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यापासून शासनाकडून येणार्‍या योग्य त्या सूचना आणि आदेशांचे जिल्हा परिषद प्रशासन वाट बघत होते. मात्र आदेश न आल्याने प्रशासनाने पुर्वीच्याच शासन आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेची तयारी केली, त्यानुसार सर्व विभागांकडून सेवाजेष्ठतेची यादी मागविण्यात आली. मात्र पुढील कारवाई रखडली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेतील बदल्यांबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले होते.

- Advertisement -

जळगाव जिल्हा परिषदेने ही बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले मात्र नाशिक जिल्हा परिषदेने मे उजाडला तरीही बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 16 मे रोजी सामान्य प्रशासन विभाग अर्थ विभाग, आणि कृषी विभाग यांच्या बदल्या होणार आहे तर 17 मे रोजी ग्रामपंचायत विभाग महिला बालकल्याण विभाग अठरा मे रोजी शिक्षण विभाग कंसात शिक्षण संवर्ग बांधकाम विभाग एक दोन तीन पशुसंवर्धन विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तर 19 मे रोजी आरोग्य विभाग यांच्या बदल्या होणार आहे. कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वेळापत्रक 

16 मे 2023 :
सामान्य प्रशासन : सकाळी 10 ते 2
अर्थ विभाग : दुपारी 2.30 ते 4
कृषी विभाग : दुपारी 4 ते 5.30

- Advertisement -

17 मे 2023 :
ग्रामपंचायत विभाग : सकाळी 10 ते 2
महिला बालकल्याण विभाग : दुपारी 2.30 ते 6

18 मे 2023 :
शिक्षण विभाग (शिक्षक संवर्ग वगळून) : सकाळी 10 ते 12
बांधकाम विभाग 1,2,3 : दुपारी 12 ते 2
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग : सायंकाळी 5 ते 6

19 मे 2023 :
आरोग्य विभाग : सकाळी 10 ते 4

- Advertisment -