Nasik-Gujarat Highway Accident : नाशिक : गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस 35 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. रविवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. (nasik gujarat highway road accident many people died and many injured)
सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी दिली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये 48 प्रवासी होते. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून ही बस खोल दरीत कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra: An accident occurred on the Nashik-Gujarat highway in Saputara, Gujarat, where a private bus fell into a 200-feet deep gorge. Seven people died, and 15 were seriously injured. The accident occurred due to the driver losing control of the bus pic.twitter.com/Iw1K6ORp7P
— IANS (@ians_india) February 2, 2025
या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका भीषण होता की, बस घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले आहेत. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झालेल्या बसमधील मृत आणि जखमी मध्य प्रदेशमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथून भाविकांना घेऊन ही बस गुजरातमधील द्वारका येथे जात होती. यातील सर्व यात्रेकरू हे मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील होते. या अपघातात 2 महिला आणि तीन पुरुषांसह सात जणांचा मृत्यू झाला तर 17 गंभीर जखमींवर आहवा येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्य जवळपास पूर्ण झाले आहे.