मुंबई – महाराष्ट्र विधानसभेत धक्कादायक निकाल समोर आले. महायुतीला विक्रमी २३० जागांवर यश मिळाले. आता या निकालावर विरोधी पक्षाकडून शंका घेतली जात आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीकेचा भडीमार केला आहे. शेवटच्या एक तासांत वाढलेली मतदानाची टक्केवारी याचे पुरावे देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर काँग्रेसचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांच्या पराभव जिव्हारी लागला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यांनी निकालावर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी 9 लाख रुपये शुल्क जमा केल्याची माहिती आहे.
नसीम खान यांचा ईव्हीएमवर सवाल
नसीम खान हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चांदिवली मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. निकालानंतर त्यांनी मतदारसंघातून फिड बॅक घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मतदारसंघातील लोक सांगत आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केले. मग ती मते गेली कुठं, असा सवाल नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. लोकांचा जर प्रतिसाद मिळाला असेल तर ईव्हीएममध्येच काही गडबड आहे का, असा सवाल करत त्यांनी पाच टक्के मशिन तापण्याची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क त्यांनी भरले आहे.
नसीम खान म्हणाले की, निकालाबद्दल एक शंका आहे. महायुतीला अचानक मतदान वाढले आहे. अचानक काही मतदान केंद्रावर युतीला मतदान वाढले आहे. त्यामुळे यात काही गडबड झाल्याची शंका येत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात अचानक 76 लाख मतदान वाढले, ते कुठून आले? ही लोकशाहीची हत्या आहे, असे घडत असताना आम्ही बोलणार. अनेक तज्ज्ञांनी याबद्दल तक्रार केली आहे. महायुतीतील समन्वयावर ते म्हणाले की, आता त्यावर बोलण्यात अर्थ नाही. आज कोणावरही आरोप करणार नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या, त्यामुळे जो निकाल आला आहे तो आला आहे असेही नसीम खान म्हणाले.
चांदिवली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे विजयी झाले. त्यांना 124641 मते मिळाली, तर नसीम खान यांचा 20625 मतांनी पराभव झाला. त्यांना 104016 मते मिळाली. ते दुसऱ्या क्रमांकवर होते.
हेही वाचा : New Government : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपदाला नकार! श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
Edited by – Unmesh Khandale