घरदेश-विदेशकालिचरण महाराजांकडून पुन्हा एकदा नथुरामचे उदात्तीकरण; म्हणाला महात्मा गोडसे...

कालिचरण महाराजांकडून पुन्हा एकदा नथुरामचे उदात्तीकरण; म्हणाला महात्मा गोडसे…

Subscribe

नथुराम गोडसेने जे केले ते योग्यच केले असे म्हटले आहे. तुम्ही नथुराम गोडसेला वाचा, तुम्ही त्याचे भक्त व्हाल- कालिचरण महाराज

कालिचरण महाराज हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. महात्मा गांधीविषयी त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता पुन्हा एकदा कालिचरण महाराज यांनी नथुराम गोडसेने जे केले ते योग्यच केले असे म्हटले आहे. तुम्ही नथुराम गोडसेला वाचा, तुम्ही त्याचे भक्त व्हाल आणि गांधीपासून दूर जाल. नथुराम गोडसेने जे केले त्याने देश वाचला, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

कालिचरण महाराजांचे वक्तव्य काय?

नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम. जितके नथुराम गो़डसेंना वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला आहे.

- Advertisement -

राहुल गांधींवरील कारवाई योग्यच

राहुल गांधी यांची खासदारकी रदद् झाली त्यावरही कालिचरण महाराजांनी भाष्य केले. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. राहुल गांधींना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहेत. हिंदू लोक हो राहुल गांधींच्या व्होटर बॅंकचे शत्रू आहेत. मात्र, हिंदू आता शेळपट नाही राहिला. फालतू सेक्युलॅरिझम हिंदूंनी सोडून दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे, असे वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले आहे.

( हेही वाचा: ‘संशयित आरोपीने पाहिला होता लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ, दारुच्या नशेत दिली संजय राऊतांना धमकी’ )

- Advertisement -

याआधीही केलेयं असे वक्तव्य

यापूर्वी देखील कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायपूर पोलिसांनी त्यांना मध्यप्रदेशच्या खजूराहोमधून अटक केली होती. कालीचरण यांनी एका धर्म संसदेत महात्मा गांदी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला नमस्कार करतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणात छत्तीसगढ पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -