घरताज्या घडामोडीमहिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील, सरकारला कोणतीही चिंता नाही - राष्ट्रीय...

महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील, सरकारला कोणतीही चिंता नाही – राष्ट्रीय महिला आयोग

Subscribe

मुंबईत एकाबाजूला लाडक्या गणरायच्या आगमनाची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळीमा फासणारी आणि मुंबईला सुन्न करणारी घटना शुक्रवारी पहाटे घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर ४० वर्षीय ओळखीच्या व्यक्तीने अमानुष बलात्कार केला. तिच्या गुप्त भागात रॉड घुसवला, त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली आणि रक्तस्त्राव झाल्याने तिचा राजावाडी रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी याप्रकरणासंबंधित राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि राज्य सरकार महिलाच्याबाबतीत संवेदनशील नसल्याचे म्हटले.

राष्ट्रीय महिला आयोग सदस्य चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, ‘जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे. संपूर्ण महाराष्ट्र गणपतीच्या आगमनाची तयार करत होता. त्याच वेळेस दुसऱ्याबाजूला महिलेवर बलात्कार होत होता. हे अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेचे किती निंदा केली तरी ती कमीच आहे. परंतु मी हे बोलू इच्छिते, गेल्या दीड आठवड्याचा रेकॉर्ड जो माझ्या जवळ आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील बलात्कारच्या घटना वाढताना दिसत आहे. मग ते पुणे असो, अमरावती असो, वसई असो किंवा मुंबई असो. महाष्ट्रातील अशा विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामागचे महत्त्वाचे कारण अपराध्यांचे मनोबल वाढले आहे.’

- Advertisement -

‘संपूर्ण देशात कोरोनाच्या काळात दीड वर्षात राज्य महिला आयोगासोबत मिळून निरंतर महिलाच्या समस्या सोडवल्या. परंतु महाराष्ट्र असे राज्य आहे, जिथे गेल्या दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगाची स्थापना झाली नाही आहे. याचाच अर्थ असा की राज्य सरकार महिलांबाबत संवेदनशील नाही आहे. कारण राज्य सरकारने महिला आयोगाची स्थापना केली असती तर अनेक महिला समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असत्या. परंतु त्या पोहोचू शकल्या नाहीत. महाराष्ट्र सरकार मोठ्या मोठ्या बाता करते, पण महिलांबाबत राज्य सरकार संवेदनशील नाही आहे. पण गेल्या दीड आठवड्यात महाराष्ट्रात सतत बलात्कारच्या घटना का घडत आहेत? याचा अर्थ पोलिसांचा जनतेवर विश्वास नाही आहे?,’ असा प्रश्न चंद्रमुखी देवींनी उपस्थितीत केला.

पुढे चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, ‘आरोपींचे मनोबल वाढले आहे. हे मनोबल नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिसांकडून काहीतरी केले पाहिजे. आम्ही पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली असून पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली आहे. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मग त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती घेतल्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल.’

- Advertisement -

हेही वाचा – साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या डॅशिंग एसीपी जोत्स्ना रासम आहेत तरी कोण?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -