घरताज्या घडामोडीPM Modi Speech in Parliament : देशात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून, संसदेला राजकीय...

PM Modi Speech in Parliament : देशात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून, संसदेला राजकीय प्रचाराचा आखाडा बनवल्याची राष्ट्रवादीची टीका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य पीएम मोदींनी लोकसभेत करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच कोरोना महामारीमध्ये काँग्रेसने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मजुरांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं, असं वक्तव्य करत मोदींना काँग्रेसला टोला लगावला होता. मात्र, देशात सर्वाधिक ट्रेन गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत. तसेच संसदेला राजकीय प्रचाराचा आखाडा बनवल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.

देशात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून

महाराष्ट्रावरील भार कमी करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं, असं मोदी म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन चालविल्या होत्या. सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत. तर उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ट्रेन गेल्या होत्या. ही माहिती केंद्र सरकारच्यावतीने १६ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत दिली गेली होती. मात्र पंजाब राज्यात श्रमिक ट्रेन गेल्या नव्हत्या. पंजाब राज्यातून खूप कमी लोक बाहेरच्या राज्यात कामगार म्हणून जातात. उलट उत्तरेतील अनेक राज्यातील कामगार हे पंजाबमध्ये शेतीच्या कामावर जात असतात. असे असतानाही पंजाबमध्ये कोरोना वाढवण्यामागे महाराष्ट्राचा बादरायण संबंध जोडण्यामागचा पंतप्रधानांचा हेतू स्पष्ट आहे. फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही, असं राष्ट्रवादीने काँग्रेसने म्हटलंय.

- Advertisement -

मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला?

कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे सध्या बिगूल वाजलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य योगायोग नक्कीच नाही. वास्तवात एका रात्रीत घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांतून परप्रांतीय श्रमिक आपापल्या गावाला मिळेल त्या साधनाने, प्रसंगी रस्त्याने चालतही गेले. मग पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे.

- Advertisement -

मोदींनी दिल्ली सरकारवर साधला निशाणा

दिल्लीतील सरकारनं गाड्यांवर माईक आणि स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगाराना आणि मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं. त्यांच्यासाठी बसची सोय करून दिली. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त नव्हता. मात्र, कोरोना संकट वाढवण्याचं पाप हे काँग्रेसने केलंय,अशा प्रकारचा गंभीर आरोप करत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


हेही वाचा : देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -