घरताज्या घडामोडीNational Health Mission: केंद्राच्या निधी वापरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

National Health Mission: केंद्राच्या निधी वापरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

Subscribe

देशाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाने केंद्राकडून मिळालेल्या निधीचा सर्वाधिक वापर करणाऱ्या राज्यांची यादी समोर आली आहे. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सर्वाधिक निधीचा वापर करणाऱ्या राज्यांच्या यादीत ओरिसा राज्य अव्वलस्थानी आहे तर, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. केंद्राकडून मिळालेल्या निधीचा वापर करण्यामध्ये महाराष्ट्राने यंदा ५१ टक्क्यांनी वाढीव झेप घेतल्याची आकडेवारी आहे. तर ओरिसाने केंद्राच्या निधीचा ५५ टक्के इतका वापर केला आहे. केंद्राच्या निधीचा सर्वात कमी वापर करणाऱ्या टॉप १० राज्यांमध्ये दिल्लीचा क्रमांक नववा आहे.

महाराष्ट्राने २१९२ कोटी रूपयांचा निधी हा २०१६-१७ मध्ये वापरला होता. तुलनेत २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने ३३०० कोटी रूपयांचा निधी हा नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत वापरला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राने याआधीच्या २०१६-१७ च्या २१९२ कोटी रूपयांच्या तुलनेत ३३०० कोटी रूपये खर्च केले आहेत. तर ओरिसाने याआधीच्या १५१४ च्या तुलनेत २३४७ कोटी रूपये यंदाच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत खर्च केले आहेत. राज्यसभेत दिलेल्या माहितीमध्ये ही माहिती सादर करण्यात आली आहे. यंदा नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत २०२०-२१ दरम्यान सर्वाधिक ९३ टक्के निधी हा ग्रामीण भागासाठी वापरण्यात आला आहे. तर उर्वरीत ७ टक्के डेटा हा शहरी भागासाठी वापरण्यात आला आहे. यंदा कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधी निर्माण करण्यासाठी हा निधी वापरण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीच्या वर्षामुळे तसेच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अनेक राज्यांमधील सरकारमार्फत रिक्त जागा भरती करण्यासाठीचा पुढाकार घेण्यात आला. त्यासोबतच आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, ऑक्सिजन खरेदी, औषधे तसेच ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगसाठी हा निधी वापरण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही हा निधी वापरण्यात आला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -