Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "देशभरात भाजपची घसरण सुरू", शरद पवारांचे मोठे विधान

“देशभरात भाजपची घसरण सुरू”, शरद पवारांचे मोठे विधान

Subscribe

मुंबई | “देशभरात भाजपची घसरण सुरू आहे. फक्त ५ ते ७ राज्यात भाजपची सरकार आहे”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly election) प्रचाराचा शेवटाचा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविला जात असला तरी, कर्नाटकातील जनता भाजपवर (BJP) नाराज असल्याचे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषेदमध्ये सांगितले.

शरद पवार म्हणाले, “देशातील केरळ राज्यापासून सुरुवात केली तर, केरळमध्ये भाजपचे सरकार नाही. त्यानंतर तामिळनाडू देखील भाजप नाही. कर्नाटकात भाजपचे सरकार येईल आम्ही अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे सरकार नाही. आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या उशारीमुळे हे राज्य त्यांच्याकडे आले आहे. नाही तर महाराष्ट्र भाजपकडे नव्हते. परंतु, आज महाराष्ट्र राज्य भाजपकडे आहे, हे मान्य कारवे लागेल. यानंतर गुजरात हे भाजपकडे आहे. सध्या मध्य प्रदेश भाजपकडे असला तरी पूर्वी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री होते. कमलनाथ सरकारमधील काही लोकांना फोडल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपची सरकार आले नाही तर मध्य प्रदेशात भाजपला संधी नव्हती. तसेच हरियाणात देखील भाजप नाही. यानंतर दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यातही भाजपचे सरकार नाही. देशांचा नकाशा पाहिला तर आता भाजपकडे कमी राज्ये आहेत. फक्त ५ ते ७ राज्यात भाजपची सरकार आहे. बाकीच्या इतर राज्यात नॉन भाजपचे सरकार आहेत. ही खरी भाजपची आजची अवस्था आहे. आता लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे मी सांगू शकणार नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभा एकत्र असतात. यामुळे त्याचा निकाल आज सांगता येत नाही.”

- Advertisement -

नाशिक प्रकल्पासंदर्भात शरद पवार म्हणाले

नाशिकच्या प्रकल्पावरून विरोध सुरू आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “जेव्हा कधी नवीन प्रकल्प येतो. तेव्हा स्थानिकांनी स्वीकार कारायला पाहिजे. पंरतु, त्या ठिकाणच्या लोकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून चालू शकत नाही. स्थानिक लोकांच्या हिताचे रक्षण करणे आणि तेथील शेतीवर प्रकल्पामुळे वाईट परिणाम होणार नाही, हे पाहावे लागणार आहे. याठिकाणी पोलीस बळाचा वापर करणे हे योग्य नाही. स्थानिकांशी चर्चा करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. आणि लोकांनासोबत घेऊन प्रकल्प केले पाहिजे. परंतु, स्थानिकांना लांब ठेवून बळाचा वापर करून तुम्ही काही कराल तर स्थानिक ऐकणार नाही. आणि पर्यावरणाला योग्य नसेल ते प्रकल्प झाले नाही पाहिजे.”

- Advertisement -

 

 

- Advertisment -