घरमहाराष्ट्रनवले पुलावरील अपघातास महामार्गाची चुकीची रचना कारणीभूत; NHI कडून चुकीची कबुली

नवले पुलावरील अपघातास महामार्गाची चुकीची रचना कारणीभूत; NHI कडून चुकीची कबुली

Subscribe

पुण्यातील नवले पुलावर एका चुकीमुळे तब्बल 48 गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा याच पुलावरील दुसऱ्या अपघातात 2 जणांनी आपले प्राण गमावले. यामुळे नवले पूल आता अपघाती पूल म्हणून ओळखला जात आहे. या पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच अपघातही होत असल्याचे समोर आले, मात्र महामार्गावरील रचना चुकीची असल्यामुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अपघात होत असल्याची जाहीर कबूली भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प (NHAI) संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

या पूलावरील तीव्र उचार आणि वाहनांचा वेग यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत अपघात रोखण्यासाठी आता पूलाचा उतार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दरी पूल ते धायरी पूल यादरम्यान ग्रेड चार पद्धतीचा असलेला उतार उड्डाणपूल आणि इतर मार्गांनी ग्रेड तीनपर्यंत आणण्यात येईल, असे झाल्यास उतार कमी होऊन अपघात कमी होतील, असंही कदम म्हणाले.

- Advertisement -

नवले पूलावर आत्तापर्यंत 60 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. गेल्या वर्षी झालेल्या भीषण अपघातात 10 नागरिकांचा मृत्यू झाला. रविवारी देखील या पूलावर तीन अपघात झाले. ट्रकने 24 वाहनांना धडक दिल्याने 12 जण जखमी झाले होते. यात पुन्हा एक ट्रकने 7 गाड्यांना उडवले होते. तर एका वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 नागरिक ठार झाला होता.

यामुळे चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पूलामुळे सातत्याने हे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या चुकीच्या कामामुळेच हे अपघात होत असल्याचे म्हटले जात आहे. यात आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीची पूलाची चुकीची रचना अपघातासाठी कारणीभूत असल्याचे मान्य केले आहे.


शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -