धक्कादायक! २२ प्रवाशांनी भरलेली एसटी आगीत जळून खाक

पनवेल बस स्थानकातून महाडला जाणारी एसटी बस आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बस जळाली केवळ बसचा सांगाडा उरला आहे.

पनवेल बस स्थानकातून महाडला जाणारी एसटी बस आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बस जळाली केवळ बसचा सांगाडा उरला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील प्रवाशांना कोणतीही इजा न झाल्याचं समजतं.

पनवेल बसस्थानकातून निघालेली ही बस महाडला जात असताना कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानंतर गाडीतून अचानक धूर निघत होता. ड्रायव्हरने गाडी थांबवत, प्रसंगावधान दाखवले आणि कंडक्टरने प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यावेळी बसमध्ये 22 ते 23 प्रवासी होते. सकाळी 9:30 वाजता ही दुर्घटना घडली.

बाहेर निघताना या बसमधील प्रवाशांपैकी एका महिला प्रवाशीची बॅग बसमध्येच राहिली. विशेष म्हणजे या बॅगेत तिचे 15 हजार रुपये असल्याची माहिती मिळते. मात्र, आग भीषण असल्याने हे सर्व पैसे जळाले.

सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. यावेळी पनवेल फायर ब्रिगेड आणि सिडको फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागलेली बस विझवली. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.


हेही वाचा – पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत, तर…