घरनवी मुंबईNavi Mumbai Bus Service: उरणला जाणारी बससेवा बंद; 'या' कारणामुळे NMTT ने...

Navi Mumbai Bus Service: उरणला जाणारी बससेवा बंद; ‘या’ कारणामुळे NMTT ने घेतला निर्णय

Subscribe

NMTT ने मोठा निर्णय घेतला आहे. NMTT ने उरणची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे आता 7 हजार प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

उरण: नवी मुंबईत झालेल्या अपघातात नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती. तसंच अनेकदा असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर NMTT ने मोठा निर्णय घेतला आहे. NMTT ने उरणची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे आता 7 हजार प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. (Navi Mumbai Bus Service Bus service to Uran stopped NMTT took the decision due to this reason)

काही दिवसांपूर्वीच उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती. त्यानंतरदेखील उरणमध्ये जाणाऱ्या बसमधील चालकाला धमकी व मारहाणीच्या घटना सुरूच होत्या. त्यामुळे उरण येथे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती. त्यानंतर आता ही बससेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

NMTT च्या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल

कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनंतर सुरक्षितता महत्त्वाची असल्याने, उरण मार्गावर धावणारी 30 ते 31 नंबरची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी योगेश कटुस्कर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. या मार्गावरील बसमूधन रोज 7 हजार प्रवासी प्रवास करत होते. नवी मुंबई परिवहन व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. परिवहन बससेवा कधी सुरू करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

उरण मार्गावरील बस बंद करण्यााबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, आजपासून उरण मार्गावर धावणारी 30 ते 31 नंबरची बससेवा बंद करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई परिवहनाच्या बसचा अपघात झाला होता. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. NMTT बसने टेम्पो आणि बाइकला दिलेल्या धडकेनंतर एकाचा मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी झाला होता. गावकऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती.

(हेही वाचा: DCM Fadnavis: मुख्यमंत्री असून मनोहर जोशींनी महापौरांची गाडी वापरली; फडणवीसांनी सांगितली आठवण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -