Homeमहाराष्ट्रकोकणNavimumbai city new : पालिकेच्या नेरूळ येथील कॅन्सर डे केअरमध्ये पहिली केमोथेरपी

Navimumbai city new : पालिकेच्या नेरूळ येथील कॅन्सर डे केअरमध्ये पहिली केमोथेरपी

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील रुग्णांना मुंबईतील परळ येथील टाटा हॉस्पीटलमध्ये पायपीट व वेळ, पैसा खर्च करुन जावे लागत होते. हीच बाब लक्षात घेता नेरुळ येथील पालिकेच्या रुग्णालयात टाटा अ‍ॅक्ट्रेक यांच्या समन्वयातून १० खाटांचे केमोथेरोपी कक्ष कार्यान्वित केले आहे. कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये शुक्रवारी (ता.१७) पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आले. या सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपचार सुविधा सुरू झाली आहे.

हेही वाचा..Badalapur : हृदयद्रावक ! माझी आई कुठेय ? अपघातातून बचावलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून डॉक्टर ही भावूक 

पालिकेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी कोपरखैरणे येथील नागरी आरोग्य केंद्र, सहा आधुनिक पालिकेच्यावतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याविषयी पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते. शस्त्रक्रियागृह, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व स्क्रिनिंग सुविधाचे उद्घाटन ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

हेही वाचा..Coldplay Concert : कोल्डप्लेसाठी नवी मुंबईत हजारो पोलीस तैनात, वाहतूक व्यवस्थेतही बदल

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून टाटा अ‍ॅक्ट्रेक यांच्या समन्वयातून नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात १० रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनिट सुरु केले आहे.रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस, विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. सॉलीड ट्युमर्सच्या रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता नसेल अशा नवी मुंबईतील रुग्णांना केमोथेरपीच्या दुसर्‍या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील.