नवी मुंबईत एकूण २५ जागा आरक्षित, पालिकेत दिसणार महिला राज

नवी मुंबईत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार असून यापैकी २५ जागा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये १३ जागांवर ओबीसी महिला आरक्षण तर १२ जागांवर ओबीसी पुरुष आरक्षण लागू करण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत आज काढण्यात आली. 

Navi Mumbai Municipal Corporation will procure 4 lakh corona vaccines through global tender
नवी मुंबई मनपा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण प्राप्त झाल्याने नवी मुंबई महापालिकेतर्फे नवी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नवी मुंबईत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार असून यापैकी २५ जागा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये १३ जागांवर ओबीसी महिला आरक्षण तर १२ जागांवर ओबीसी पुरुष आरक्षण लागू करण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत आज काढण्यात आली.

हेही वाचा मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना दणका, ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित

यंदा नवी मुबंईमध्ये ११ नगरसेवकांच्या जागा वाढल्या आहेत. ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा असून विधानसभेतील सर्व नगरसेवकांची तुलना केल्यास ऐरोली विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने ओबीसी आरक्षणाचा फटका या पालिकेला बसणार नाही.

निवडणुकीनंतर महिला राज

महिलांना पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्यावर नवी मुंबईत महिला राज दिसणार आहे. तर, अनेक प्रभागात जोड्याने नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. १२२ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांच्य जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. यापैकी ६१ ठिकाणी आरक्षणानुसार संधी मिळणार आहे.

हेही वाचा – अजान सुरू होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण, अन् सभास्थळावर…

दरम्यान, एकूण प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २०.५९ टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती दाखल केल्यावर याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

नवी मुंबई मनपाच्या निवडणुका प्रथमच बहुसदस्य पद्धतीने होत आहेत. एकूण 41 प्रभाग असून यात 40 प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभागात द्विसदस्यीय पद्धतीने असणार आहे. एकूण प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत 20.59 टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या आहेत. यासाठी आता नागरिकांच्या सूचना आणि हरकती दाखल केल्यावर याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगामार्फत घेतला जाणार आहे. मंगळवारी हरकती सूचना मांडण्याचा अखेरचा दोन दिवस आहे.

हेही वाचा – पुणे पालिकेत ८७ जागा महिलांसाठी, ४६ जागा ओबीसींसाठी राखीव; खुल्या गटातील इच्छुकांचा हिरमोड