लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, राणा दाम्पत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

navneet rana attacks cm uddhav thackeray and shiv sena in her pc
लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

शिवसेनेची काल मुंबईत आयोजित सभा म्हणजे लाचर मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती अशा शब्दात अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि लोडशेडिंगबद्दल एक शब्दही उच्चारला नाही, फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. आज त्या दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. मुख्यमंत्री अडीच वर्षे कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. पण उद्धव ठाकरे गेल्या अडीच वर्षात विदर्भात कोणत्या गावात फिरकले, शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले हे दाखवून द्यावे. देवेंद्र फडणवीस सरकारनंतर आता बेरोजगारीत तिप्पट वाढ झाली. मात्र यावर मुख्यमंत्री यावर एकही शब्द बोलले नाही. त्यांनी कोणाला रोजगार दिले सांगावे, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

यावेळी औरंगाबादच्या नामकरणावरूनही नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की,
औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं त्यांनी सांगितले होते. पण व्यासपीठावर बोलताना नामांतरणाची काही गरज नाही असा सवाल उपस्थित केला. आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली साथ सोडतील आणि आपली सत्ता जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दाखवले. पण मुख्यमंत्री एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत. त्यांना माहित आहे की नाव बदललं तर बाकीचे पक्ष बाजूला होतील. अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी हनुमानाचा अपमान केला.

एका खासदाराने मुख्यमंत्र्यांच्या हातात गदा देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी त्याला हात न लावता ते मागे फिरले. गदा कोणी दिली तर त्याला हातात घेऊन त्यानंतर गदा दुसऱ्याकडे दिली जाते. पण मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेऊन हनुमानाचा अपमान केलाय. असा आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री

बाळासाहेब असते तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याला त्याच कबरीमध्ये गाडलं असतं, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आजचे मुख्यमंत्री लाचार आहेत. त्यांच्या सभेत कोणताही उत्साह दिसत नव्हता. ही सभा मुंबई महापालिकेसाठी होती आणि सगळ्या राज्यातून लोक तिथं आले. मात्र मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढायला हवी, याचं उत्तर त्यांनी का दिलं नाही? बाळासाहेब कधी लढले नाहीत, सत्तेवर बसले नाही, कायम शिवसेनेला वाढवत राहिले. इतिहासात पाहा, हनुमान चालिसा तोच वाचतो, ज्याला कोणालातरी संकटातून मुक्त करायचं असतं. आणि तुम्ही म्हणता, का हनुमान चालिसा म्हणायची? ही तुमची नवी विचारधारा आहे. असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

मुन्नाभाई चित्रपट आला होता. कोणाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना बाळासाहेब दिसतात. मुन्नाभाई सुपरहिट पिक्चर होता, तसं हे हिट झाले तर तुम्ही सुपरफ्लॉप व्हाल. जे स्वप्न पाहतात, तेच ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात. तुम्हाला त्यांच्या शालीबद्दलही समस्या आहे. अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली.


गिरीश महाजनांनी उपमा देताना प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करावा; किशोरी पेडणेकरांचा पलटवार