अजित पवारांनी सांताक्रूझ पोलीस कोठडीतील CCTV फुटेज जारी करावं, नवनीत राणांचे आव्हान

Navneet Rana challenges Ajit Pawar should release CCTV footage of Santa Cruz police cell
अजित पवारांनी सांताक्रूझ पोलीस कोठडीतील CCTV फुटेज जारी करावं, नवनीत राणांचे आव्हान

पोलीस कोठडीमध्ये चहा देण्यात आला, पाणी देण्यात आली असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपल्याला पोलीस कोठडीमध्ये जातीवरुन शिवीगाळ करण्यात आली. तसेच पिण्यासाठी पाणी मागितल्यानंतर पाणीसुद्धा दिले नाही असा आरोप केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आले असल्याचे सांगितले आहे. यावर आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी एकदा सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील व्हिडीओ तपासावा आणि तो व्हिडीओ जारी करावा असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर आरोप केला आहे. जेलमध्ये आपल्याला शिवीगाळ करण्यात आली. तसेच पिण्यासाठी पाणी देण्यात आले नाही. असे आरोप केले आहेत. यावर राज्य सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ जारी करत आरोप फेटाळले होते. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांना चहा आणि पाणी दिले असल्याचे दिसत आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा आरोपींनी पाणी दिले असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये सगळं दिसत आहे. आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार म्हणाले होते. परंतु आता नवनीत राणा यांनी अजित पवार यांना व्हिडीओ तपासण्याची विनंती केली आहे.

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडीओर भाष्य केलं आहे. परंतु अजित पवार यांना विनंती आहे की, त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील व्हिडीओ एकदा पहावा. तेथील परिस्थितीची त्यांनी माहिती घ्यावी असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत. परंतु तुम्हीच सक्षम उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही सर्व कामकाज पाहत आहात. तुम्हाला आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र दादा असे म्हणतो त्यामुळे तुम्ही एकदा परिस्थितीची माहिती घ्यावी असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

रवी राणांकडूनही व्हिडीओ जारी करण्याचे आव्हान

जो अन्याय झाला आहे. अहंकारी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर जो जूल्म करण्यात आला आहे. सांताक्रूझ लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ पर्यंतचे व्हिडीओ दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करतो असे रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आम्हाला अटक केल्यानंतर चहा पाजला आम्ही चहा पिलो होतो. आमच्यासोबत वकीलसुद्धा होते. तुम्हाला बेल देतो असे आम्हाला सांगण्यात आले. जेव्हा रात्री साडेबारा वाजता सांताक्रूझच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिकडे बसायला सांगितले तेव्हा खासदार नवनीत राणा यांना त्रास देण्यात आला. आम्हाला रात्री पाणी देण्यात आले नाही. सतरंजी देण्यात आली नाही. लॉकअपमध्ये नवनीत राणा यांना उभे राहावे लागले. ज्या त्रासामध्ये आम्हाला सकाळी ५ वाजेपर्यंत पाणी देण्यात आले नाही. या सगळ्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घ्यावी. त्यांनी माहिती घेऊन एकाला अशा प्रकारची वागणूक महिला खासदाराला देण्यात येत असेल तर त्याचीसुद्धा अजित पवारांनी माहिती घेतली पाहिजे असे रवी राणा म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाबाबत केंद्रीतल नेत्यांकडे तक्रार करणार – रवी राणा