घरमहाराष्ट्रNavneet Rana : नवनीत राणांच्या हक्कभंग तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना...

Navneet Rana : नवनीत राणांच्या हक्कभंग तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना नोटिसा

Subscribe

मुंबईचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि उपायुक्त शशिकांत सातव यांनाही नोटीस देण्यात आलीय. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केलेल्या हक्कभंग तक्रारीनंतर राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हक्कभंग प्रकरणात अमरावती आणि मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालकांना नोटीस बजावण्यात आलीय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना 6 एप्रिलला लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय.

मुंबईचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि उपायुक्त शशिकांत सातव यांनाही नोटीस देण्यात आलीय. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यात 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिएकर नुकसानभरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं, यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको केला. याच दरम्यान आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलिसांनी अटक केली होती आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते.

15 नोव्हेंबर 2020 ला खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अपशब्द वापरल्याचं खासदार नवनीत राणा यांनी अशी तक्रार केली होती. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे 12 जानेवारी 2021 ला तक्रार केली. या प्रकरणात आता या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -