घरमहाराष्ट्रनवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करा...पोलिस अधिकाऱ्यांची मागणी

नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करा…पोलिस अधिकाऱ्यांची मागणी

Subscribe

खासदार नवनीत राणा यांनी  मुलीसंदर्भात केलेला लव्ह जिहादचा दावा खोटा ठरला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र दालातून अधिकारी पदावरुन निवृत्त झालेल्या भाऊसाहेब आंधाळकर यांनी केली आहे. जर नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही  तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी अमरावती मधील लव्ह जिहाद प्रकरणावरुन पोलिस ठाण्यात जाऊन आक्रमक पद्धतीने पोलिसांसोबत वर्तुणूक केली. यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

नेमकं प्रकरण काय ? 

- Advertisement -

अमरावतीमध्ये एका हिंदू मुलीचा आंतरधर्मीय विवाह करण्यात आला आणि तिला डांबून ठेवण्यात आले. हे प्रकरण लव्ह जिहाद आहे असा दावा करत खासदार नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्या पोलिसांवर प्रचंड संतापल्या इतकंच काय तर राणा यांनी पोलिसांसोबत आक्रमक होत संवाद साधला याविरोधात आता निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएसन या संघटनेअंतर्गत नवनीत राणा यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आंधाळकर यांनी मुंबई, पुण्यासह इतर काही शहरांमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे.

नवनीत राणांनी लव्ह जिहादचा केलेला आरोप खोटा

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांनी  मुलीसंदर्भात केलेला लव्ह जिहादचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली मुलगी पोलिसांना सापडली, मात्र तिने दिलेला जबाब हा नवनीत राणांना तोडांवर पाडणारा आहे. कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडल्याचा जबाब पोलिसांना दिला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

 

_________________________________________________

हे ही वाचा – कुटुंबीयाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घर सोडले, नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा दावा खोटा?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -