घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री होणारी महिला घरातील की बाहेरची?, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री होणारी महिला घरातील की बाहेरची?, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदावर एका महिलेला संधी द्यायची आहे, असे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, महिला मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्यावरून भाजप खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडतायेत. पहिले विरोधी पक्षनेतेपद द्यावे मग मुख्यमंत्रिपद द्यावं. आता ही महिला घरातीलच आहे की बाहेरची?, घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का?, असं सवाल नवनीत राणांनी उपस्थित केला.

- Advertisement -

महिला मुख्यमंत्री नक्कीच व्हायला पाहिजे. परंतु ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं आहे, ते त्यांच्या तोंडातून शोभत नाही. ज्यांना स्वत: मुख्यमंत्री होण्याची हौस आहे ते कसं काय हे स्वप्न पाहू शकतात. आम्ही त्यांच्या या व्यक्तव्याला गांभीर्याने घेत नाही. पण जर राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्या तर गर्वच होईल, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे देशात मोठी ताकद आपण उभी करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर नवनीत राणांनी सवाल उपस्थित करत ठाकरेंवर टीका केली आहे. आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महिला मुख्यमंत्री : नव्या घोषणेतून उद्धव ठाकरे यांचा कोणावर निशाणा?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -