घरताज्या घडामोडीनवनीत राणांनी डी गँगशी संबंधित लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं; राऊतांचा गंभीर...

नवनीत राणांनी डी गँगशी संबंधित लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं; राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न, ईडी चौकशी करणार का?, संजय राऊतांचा सवाल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंधित युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भातील कागद ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला देखील प्रश्न केले आहेत.

नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाला जी माहिती दिली होती, तो कागद संजय राऊत यांनी समोर आणला आहे. राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नवनीत राणा यांनी युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं आहे. ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. लकडावालाला ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याचे डी गँगशी संबंध होते. त्यामुळे ईडीने या प्रकरणाचा तपास केला का? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

नेमकं कागदपत्रात आहे काय?

राऊतांनी निवडणूक आयोगाला जी राणांनी माहिती दिली तो कागद ट्विट केला आहे. यामध्ये कोणाकडून कर्ज किंवा इतर प्राप्त देणगी रक्कम यासंदर्भात माहिती विचारली आहे. त्यामध्ये राणा यांनी युसूफ लकडावालाकडून ८० लाख रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

कोण आहे युसूफ लकडावाला?

युसूफ लकडावाला हा दाऊद गँगशी संबंधित होता. तो एक बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता देखील होता. २८ मे २०२१ रोजी ईडीने त्याला खंडाळ्यातील हैदराबाद नवाबाच्या ५० कोटी रुपयांच्या जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे बनविल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केली होती. त्याचा ९ सप्टेंबर २०२१ रोजी आर्थर रोड तुरुंगात मृत्यू झाला. लकडावालावरती कुख्यात गंड दाऊद इब्राहिमचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे आरोप करण्यात आले होते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -