नवनीत राणांची जेलमधून सुटका, छातीत दुखत असल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल

non baillable arrest warrant against mp navneet rana

खासदार नवनीत राणा यांना अखेर बाराव्या दिवशी जेलमधून सोडण्यात आले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या निर्णयाची प्रत जेलमध्ये सादर केल्यानंतर नवनीत राणा यांची सुटका झाली आहे. परंतु नवनीत राणा यांच्या छातीत दुखत आहे. तसेच त्यांचा स्पॉंडेलिसिसचा अजार बळावल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. नवनीत राणा यांची सुटका झाली आहे. परंतु तळोजा कारागृहात असलेल्या आमदार रवी राणा यांची अद्याप सुटका झाली नाही. थोड्याच वेळात त्यांचीसुद्धा सुटका होऊन ते थेट लिलावती रुग्णलयाकडे रवाना होतील.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राज्यात सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी अटक केली होती. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मोतश्रीबाहेर हनुमान चालीस पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. राणा यांनी भूमिकेवरुन माघार घेतली होती परंतु तोपर्यंत मुबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. राणांवर राजद्रोहाचासुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असून त्यांना आता जेलमधून सोडण्यात आले आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाची प्रत भायखळा जेलमध्ये जमा केल्यानंतर नवनीत राणा यांची सूटका करण्यात आली आहे. तसेच तळोजा कारागृहात आता रवी राणांच्या सुटकेसाठी कोर्टाच्या निकालाची प्रत देण्यात येईल. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर रवी राणा यांना सोडण्यात येईल. राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तसेच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यात बंदी असेल. असे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी सांगितले आहे.

नवनीत राणा तुरुंगातून रुग्णालयात

खासदार नवनीत राणा यांची जेलमध्ये तब्येत बिघडली होती. त्यांना मानेचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. तसेच छातीत दुखत असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे त्यांना आता जेलमधून सुटल्यानंतर आता लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.


हेही वाचा : मी ब्राम्हणाला नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो, दानवेंचं वक्तव्य अन् शिवसेनेचा पलटवार