घरदेश-विदेशशेतकऱ्यांच्या मदतीसाठी मी माझे घरही पेटवू शकते - नवनीत राणा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मी माझे घरही पेटवू शकते – नवनीत राणा

Subscribe

शिवसेनेकडून केंद्र सरकारवर टीका होत असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी शिवसेनेवर केला.

‘शेतकऱ्यांना जर खरच मदत करण्याची भावना माझ्या मनात असेल तर त्यासाठी वेळ पडली तर मी माझं घरही पेटवू शकते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बहुमताचे सरकार स्थापन देखील करु शकते’, असे महाराष्ट्रातील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा संसदेत म्हणाल्या. सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्रातील ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहात केंद्र सरकारला धारेवर धरले. दरम्यान, शिवसेनेकडून केंद्र सरकारवर टीका होत असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी यावेळी शिवसेनेवर केला.


हेही वाचा – ‘कभी कभी लगता है अपुनही भगवान है’; राऊत संसदेत बरसले

- Advertisement -

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

‘शिवसेनेच्या दोन-तीन खासदारांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संसदेत भाष्य केलं. संसदेत आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांवर बोलतात. मात्र, राज्यात लोकांनी युतीला साथ दिली असताना शिवसेनेनं आपल्या स्वार्थासाठी राज्यात सरकार स्थापन होऊ दिलं नाही. जर शेतकऱ्यांप्रती इतका कळवळा, इतकी सहानुभूती आहे तर सरकार स्थापन करायला हवे होते. राज्यावर ओल्या दुष्काळाचं मोठं संकट आलं आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या राष्ट्रपती राजवटीत सर्वात मोठा हात हा शिवसेनेचाच आहे. स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:चं घर या गोष्टींकडे लक्ष दिलं नसतं तर आज राज्यात सरकार स्थापन झालं असतं. शेतकऱ्यांना जर खरच मदत करण्याची भावना माझ्या मनात असेल तर त्यासाठी वेळ पडली तर मी माझं घरही पेटवू शकते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बहुमताचे सरकार स्थापन देखील करु शकते’, असे नवनीत राणा म्हणाल्या.


हेही वाचा – राज्यात सत्तापेच आणि संसदेत मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक

- Advertisement -

‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची मदत करा’

‘आज प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये फिरुन पिकांची पाहणी केली तर सोयाबीन, कापूस, मूंग, कडधान्य सारख्या सर्व पिकांचे ओल्या दुष्काळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत आज आमच्या महाराष्ट्राचा कुणीच मायबाप नाही. त्यामुळे मी केंद्राला सांगते की आमच्या राज्याचे मायबाप फक्त केंद्र आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची मदत करायला हवी. ज्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनचे घर चालू शकते’, असे नवनीत कौर राणा म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -