Navratri 2021: दररोज ६० हजार भविकांना तुळजाभवानीचे दर्शन, लसीकरण पुर्ण झालेल्यांनाच प्रवेश

७ ऑक्टोबरपासून देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल.

येत्या ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवात मिळालेल्या माहितीनुसार, दररोज ६० हजार भविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी दीव,उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा बंदी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुळजापुरात देखील प्रशासनाकडून संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा २९ सप्टेंबरला असून ७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव संपन्न होणार आहे. ७ ऑक्टोबरपासून देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल. देवीचे दर्शन घेण्यासाठी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण झाले असल्यासच मंदिरात प्रवेश मिळेल.

तुळजापुर हे राज्यातील महत्त्वाचे देवस्थान असून इतर राज्यातील भाविक देखील नवरात्र उत्सवात दर्शनला येत असतात. कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यातून तुळजापूरला येणाऱ्या भविकांना बंदी असणार आहे. तुळजापूर जिल्ह्यात भाविक किंवा वाहने येण्यावर बंदी असणार आहे.

शारदीय पौर्णिमेच्या एक दिवस आधी, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस तुळजापुरात संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंद करुन पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त तुळजापुरात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती तुळजापुर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा – भयंकर! स्मशानभूमीत अघोरी कृत्य; अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून केली पूजा