घरमहाराष्ट्रNawab Malik : पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची..., फडणवीसांच्या पत्रावर संजय...

Nawab Malik : पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…, फडणवीसांच्या पत्रावर संजय राऊतांचा टोला

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आज, गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे आता अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्तेतील सहभागावर आक्षेप घेतला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत, खोचक टीका केली आहे.

हेही वाचा – Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा अभ्यास करणं गरजेचं; जयंत पाटील यांचा टोला

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे विधानसभेत थेट सत्ताधारी बाकांवर बसले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. हे पत्र खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाने ट्वीट केले आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : फडणवीसांचे पत्र म्हणजे महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही तर…; वडेट्टीवारांचा दावा

त्याचा संदर्भ देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे पोपटलाल (किरीट सोमय्या) यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त नवाब मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल; फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादीची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -