घरताज्या घडामोडीदेशमुखांविरोधात भाजपचे कट-कारस्थान, एनआयएच्या चार्जशीटवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

देशमुखांविरोधात भाजपचे कट-कारस्थान, एनआयएच्या चार्जशीटवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

Subscribe

एनआयएने या केसचा ताबा घेतला आणि परमबीर सिंहला वाचवण्यासाठी त्यांनी आश्वासित केलं

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक मोठा कट असून आणखी काही संशयित असल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे. एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांचे नाव देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे वगळण्यात आलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कट-कारस्थान भाजपकडून करण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच एनआयएच्या चार्जशीटमध्ये मुख्य आरोपींना बगल दिली असून परमबीर सिंह यांना या प्रकरणात वाचवण्यात येत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टने सांगितले आहे की, सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्याच्याबाबतीत ५ लाख रुपये देण्याचं काम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलं होते. एकंदरित अँटिलिया केसमध्ये सचिन वाझेला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये ज्यांना परमबीर सिंहनी पोलीस सेवेत समावून घेतले, विशेष अधिकार ज्यांना देण्यात आलं या घटनाक्रम झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे काम त्यांच्याच हातात देण्याचे काम परमबीर सिंह यांनी केलं असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिशाभूल करत असताना विधानसभेत त्या पद्धतीने विषय समोर येत होते. जेव्हा याचा तपास एटीएसने करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना खात्री वाटायला लागली की या प्रकरणात सचिन वाझेच्या माध्यमातून हा घटनाक्रम घडवण्यात आलं आहे. यानंतर एनआयएने या केसचा ताबा घेतला आणि परमबीर सिंहला वाचवण्यासाठी त्यांनी आश्वासित केलं आहे. यामुळे या एनआयएच्या चार्जशीटमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं नाही. या केसमधून त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखवर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपकडून झालं असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

या प्रकरणात जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना आरोपी करण्यात आलं नाही. बरेचसे काही आणखी याच्यातून येऊ शकत होते मात्र एनआयएने काही चौकशी केली नाही. काही लोकांना एनआयएकडून वाचवण्याचं काम करण्यात येत आहे. आम्हाला वाटत आहे की, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते त्यासाठी त्यांना जीवनदान देण्यात आलं आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -