घरताज्या घडामोडीMoney laundering case: तिन्ही राज्यातील भाजप सरकारची परमबीर सिंहांना पळून जाण्यासाठी मदत-...

Money laundering case: तिन्ही राज्यातील भाजप सरकारची परमबीर सिंहांना पळून जाण्यासाठी मदत- नवाब मलिक

Subscribe
सोमवारी रात्री उशिरा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी केंद्रातील सत्तेच्या दुरूपयोगावरही त्यांनी टीका केली आहे. अनिल देशमुख यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचे सांगतानाच, परमबीर सिंह कुठे आहेत हे शोधण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, अशीही आठवण त्यांनी करून दिली. परमबीर सिंह यांना पळून जाण्यासाठी भाजपचे सरकार असलेल्या राज्यांनी मदत केल्याचाही आरोप त्यांनी केला.
अनिल देशमुख यांना राजकारणातून फसवल गेल आहे. देशमुखांवर आरोप करणारा फरार आहे. पण ईडीच्या तपासाला सहयोग करणाऱ्याला मात्र अटक करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडी या राजकारणाने प्रेरित आहेत. तसेच सरकारला बदनाम करण्यासाठी आणि नेत्यांना घाबरवण्यासाठी या गोष्टी सुरू आहेत. आम्हाला कितीही घाबरवण्याचे काम केले तरीही आम्ही घाबरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर करून सत्तेच्या दुरूपयोगाचे काम बंद व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईवर ते बोलत होते.

तीन राज्याच भाजपचेच सरकार

अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई ही सूड बुद्धीने करण्यात आली आहे. पण दुसरीकडे मात्र परमबीर सिंह यांना मात्र पळून जाण्यात भाजपने मदत केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या तिन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. एखादा व्यक्ती देशाच्या हवाई मार्गाने जात नाही तर रस्ते मार्गाने परमबीर सिंह यांना पळवण्यात आले का ? तिन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे. त्यामुळेच अन्य लोकांसारखेच परमबीर सिंह यांना पळवले का ? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी केला. परबीर सिंह कुठे आहेत हे सांगण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. या तीन राज्यातून रस्त्याने नेपाळमार्गे परमबीर सिंह भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपने मदत केल्याचाही आरोप त्यांनी केला.

कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही…

पुढचा नंबर हा अनिल परब याचा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेतून सूडबुद्धीने ही कारवाई झाली आहे. वारंवार खोट्या आरोपातून सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात ये आहेत, असेही नवाब मलिक म्हगणाले. पण कोणीही कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही घाबरणार नाही. याआधी धमकीचे कॉल हे राजस्थानातून येत होते. आता थेट महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीच धमकी द्यायला सुरूवात केली असल्याचे ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -