घरमहाराष्ट्रसमीर वानखेडे दोन व्यक्तींच्या मदतीने फोन टॅप करतात; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

समीर वानखेडे दोन व्यक्तींच्या मदतीने फोन टॅप करतात; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे दोन व्यक्तींच्या मदतीने फोन टॅप करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे.

समीर वानखेडे यांनी माझी मुलगी निलोफर मलिक हिचा सीडीआर रिपोर्ट मागितला होता, अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी पुढे बोलताना समीर वानखेडे दोन लोकांच्या मदतीने फोन टॅप करत आहेत, असा आरोप केला. लोकांच्या फोनमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक व्यक्ती मुंबईत आहे आणि दुसरा व्यक्ती ठाण्यात आहे. आज नाही तर उद्या हे समोर येईल की समीर वानखेडे कशा पद्धतीने लोकांचे बेकायेदशीररित्या फोन टॅप करत आहेत आणि त्याचे पुरावे आम्ही सर्वांच्या समोर ठेवणार, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

मुंबई पोलिसांकडे माझ्या मुलीचा सीडीआर रिपोर्ट मागितला. आम्ही कोणत्या व्यक्तीची खासगी माहिती आम्ही देऊ शकत नाही, असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. या शहरात दोन खासगी व्यक्तींच्या मदतीने वानखेडे लोकांचे फोन टॅप करत आहेत. त्या दोन व्यकींची नावं माझ्याकडे आहेत. त्यांचा पत्ता माझ्याकडे आहे. ही लढाई लांबपर्यंत जाणार आहे. त्या गोष्टींना देखील आम्ही समोर आणणार आहोत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला

नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा जावई समीर खान प्रकरणावर बोलताना वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितल्याचं सांगितलं. माझ्या जावयाला खोट्या पद्धतीने जेलमध्ये टाकलं. न्यायालयात लढाई सुरु आहे. माझी मुलगी कागदपत्रांवर काम करत आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये यांचे सीडीआर (Call Detail Record) उपलब्ध करुन द्या, अशी मागणी केली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – समीर वानखेडे दोन व्यक्तींच्या मदतीने फोन टॅप करतात; नवाब मलिकांचा गंभीर आरोप


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -