समीर वानखेडेंचा दारूचा व्यवसाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

व्यवसाय करणे म्हणजे सरकारी नियमांची पायमल्ली...

NCP-Leader-Nawab-Malik

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे ( एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे दारूचा व्यवसाय करीत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. असा व्यवसाय करणे म्हणजे सरकारी नियमांची पायमल्ली असून वानखेडे यांनी हा परवाना नियमबाह्य मिळाल्याचा दावाही मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

समीर वानखेडे यांचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी त्यांनी समीर दाऊद उर्फ ज्ञानदेव वानखेडे याच्या नावावर सन १९९७ – ९८ मध्ये दारू विक्रीचा परवाना घेतला. हे परमिट सन १९९७ पासून समीर वानखेडे याच्या नावावर नुतनीकरण होत राहिले आहे. मद्य विक्रीचा परवाना मिळाला तेव्हा समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे १० महिने १९ दिवस होते, अशी माहिती मलिक यांनी दिली.

मूळात १८ वर्षाखालील कुणालाही परवाना दिले जात नाही. असे असताना १९९७ पासून आजपर्यंत सद्गुरु रेस्टॉरंट आणि बार हा व्यवसाय सुरू आहे. २०१७ मध्ये समीर वानखेडे यांनी आपली संपत्ती जाहीर केली. त्यात या बारचा उल्लेख करताना १९९५ मध्ये त्याची किंमत एक कोटी रुपये दाखवली आहे. या बारचे वर्षाला दोन लाख रुपये भाडे मिळते असल्याचे नमूद केले आहे. २०२० मध्येही बारची तीच किंमत आणि तितकेच भाडे मिळत असल्याचे वानखेडे यांनी नमूद केले असून हा खोटारडेपणा आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

सनदी अधिकाऱ्यांना दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करावी लागते. मात्र नोकरीस लागल्यानंतरही म्हणजे २०१७ पर्यंत ही माहिती लपविण्यात आली. आहे. खरेतर केंद्र सरकारच्या नियमानुसार कुठलाही सरकारि अधिकारी नोकरी करत असताना कोणताही व्यवसाय करु शकत नाही.