नवीन दाखल्याच्या आधारावर वानखेंडेंचा शाळेतील प्रवेश, जात प्रमाणपत्रावर मलिकांचा खुलासा

एका अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन नावाची अफरातफर...

NCP-Leader-Nawab-Malik

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जन्माचं प्रमाणपत्र मी ट्विटरवर शेअर केलं होतं. इथेनूच फर्जीवाड्याची सरूवात झाली. समीर वानखेडेंचे वडील न्यायालयात गेले होते. की नवाब मलिकांच्या बोलण्यावर लगाम घातलं जावं. काही कागदपत्रे आम्ही ट्विट केले आहे. याची सुरूवात आता फर्जीवाड्यापासून सुरू झाली आहे. २७ एप्रिल १९९३ मध्ये त्यांच्या नावात बदलाव करण्यात यावा, अशा प्रकारचे आरोप नवाब मलिक यांनी केले आहे. १९९३ मध्ये एक पुरावा म्हणून कागदपत्रक महापालिकेच्या समोर ठेवण्यात आले होते. जो पुरावा मी तुम्हाच्यासमोर शेअर केला आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की, १४ डिसेंबर १९७९ या वर्षी समीर वानखेडेंचा जन्म झाला असून त्यामध्ये श्री. ज्ञानदेव वानखेडे आणि श्रीमती जायदा वानखेडे आग्रा अशी कागद पत्रक असल्याचा पुरावा दोन व्यक्तींनी सादर केला आहे. असं नवाब मलिक म्हणाले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जन्माच्या प्रमाणपत्राबाबत मोठे खुलासे केले आहेत. जीवन जोगुरू आणि अरूण एन. चौधरी. अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी पालिकेत सादर केलेल्या पुराव्यात म्हटलंय की, दाऊद वानखेडे असं नाव नसून ते ज्ञानदेव वानखेडे असं आहे. त्यावेळी ते शक्य झालं नसतं. परंतु त्यांनी एका अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन नावाची अफरातफर करण्यात आली. त्यानंतर नवीन दाखला तयार करण्यात आला. तसेच त्यांनी सादर केलेल्या पुरव्यानुसार नवीन कागद पत्रकात त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असं करण्यात आल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं आहे.

नवीन दाखल्याच्या आधारावर त्यांनी सेंट पॉलच्या शाळेत प्रवेश घेतला होता. शाळेमध्ये प्रवेश घेण्यावेळी सुद्धा त्यांच्या कागद पत्रकावर समीर दाऊद वानखेडे असं नाव असून एका मुस्लिम नावाच्या आधारावर त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांना नवीन लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालं. सेंट जॉसेफमध्ये सुद्धा प्रवेश घेण्यावेळी हेच नाव होतं. परंतु लिव्हिंग सर्टिफिकेट घेतावेळी त्या नावामध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे असं नाव नोंदवण्यात आलं होतं.

फर्जीवाड्याच्या आधारावर अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स बदलण्यात आले. १९९५ मध्ये मुंबईच्या कलेक्टर जवळ एक अर्ज दाखल करण्यात आला. वडीलांच्या जातीचा दाखला दाखवण्यात आला. जुन्या शाळेचा दाखला न दाखवता त्यांनी सेंट जॉसेफ मधल्या शाळेचा नवीन दाखला सादर केला गेला. त्यानंतर शेड्यूल कास्टचं प्रमाणपत्र त्यांनी घेतलं.

या जातीच्या प्रमाणावर त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने देखील महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षा घेत त्यांनी IAS ची नोकरी मिळवली. हे सर्व फर्जीवाडा आहे. स्रुटनी समितीच्या समोर हे सर्व प्रकरण समोर ठेवण्यात येणार आहे. दोन संघटनांनी तक्रार दाखल केली असून मला असं वाटतंय की, यावर सुनावणी होईल. यांचा दाखला ज्या आधारावर मिळवला आहे. तो दाखला रद्द होऊन त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते. तसेच समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन विभागात काम करत होते. त्याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा सादर केला आहे.

जेव्हा समीर वानखेडे हे १७ वर्षाचे होते. त्यांचे वडील उत्पादन विभागात काम करत होते. तरीदेखील त्यांना लायसन्स मिळालं. १८ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला लायसन्स दिलं जाऊ शकत नाही. तरी सु्द्धा मुलाच्या नावावर लायसन्स देण्यात आलं असून बार आणि रेस्टॉरन्ट सुरू आहेत. आता २५ वर्ष झाले असून ते लायसन्स अद्यापही रद्द करण्यात आलं नसून हे बार आणि रेस्टॉरंट समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावावर अद्यापही सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.