घरताज्या घडामोडीगुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब

गुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब

Subscribe

गुजरात ड्रग्ज कनेक्शनबाबत मोठा खुलासा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुजरात ड्रग्ज कनेक्शनबाबत मोठा खुलासा केला आहे. द्वारकामध्ये ३५० कोटींचा ड्रग्ज सापडला आहे. हा योगायोग असू शकतो का?, मनिष भानुषाली, धवल भानुषाली, केपी गोसावी आणि सुनिल पाटील हे सर्व लोक सतत अहमदाबादच्या पंचतारांकित ५ स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. गुजरातच्या एका मंत्र्यांसोबत त्यांची जवळीक आहे. हे सर्व लोक ड्रग्जचे खेळाडू आहेत. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू होत नाहीये ना? अशा प्रकारचा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. असं नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

महाराष्ट्रात २ आणि ३ ग्रॅमची कारवाई करत सिनेसृष्टीतील लोकांच्या नावाने पब्लिसिटी केली जात आहे. तसेच लोकांचं लक्ष विचलित करण्यात येत आहे. गुजरातमधून ड्रग्जचा धंदा सुरू असल्याची शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. एनआयएजवळ मुंब्रा पोर्टची केस सुपूर्द करण्यात आली आहे. तरीसुद्दा द्वारकामध्ये ३५० कोटींचा ड्रग्ज पकडण्यात आला. त्यामुळे या चौकशीची तपासणी योग्य रितीने होईल, अशी आमची आशा आहे. असं मलिक म्हणाले.

- Advertisement -

हा संपूर्ण खेळ गुजरातच्या मार्गाने…

त्यांनी पुढे सांगितलं की, कोण किती मोठं आहे आणि इफ्लून्सल आहे. तसेच कोणत्या पक्षाच्या नेता किंवा कार्यकर्ता मोठा आहे. या सर्व गोष्टींना डावलून एनआयए आणि एनसीबीचे जे हेड किंवा देशाचे डी.जी एनसीबी आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की, १९८५ च्या कायद्यानुसार संपूर्ण देशातून अंमली पदार्थाचा धंदा नेस्तनाबूत करण्यात यावा. जर हा खेळ गुजरातच्या समुद्र मार्गाने येत आहे. गुजरातमधून हा संपूर्ण खेळ पसरवण्यात येत आहे. त्यामुळे डी.जी एनसीबी यांनी गंभीर प्रकरणात लक्ष घालून त्यांनी सखोल चौकशी करावी आणि गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय आहे, हे देशासमोर उघड करावं. जे गुन्हेगार आहेत. त्यांना अटक करत शिक्षा देण्यात यावी, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत आमच्या जावयावर काही गंभीर आरोप केले होते. समीर खान यांच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे आरोप करण्यात आले होते. आम्ही कालच सांगितलं होतं की, माझी मुलगी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. त्यानुसार तिने देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु फडणवीस यांना क्षमा मागण्याची मागणी करण्यात आली आहे. जर त्यांनी क्षमा मागितली नाही, तर फडणवीसांवार अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. या देशात बोलण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. परंतु बदनामी करण्याचा नाही. निश्चितरूपाने ज्यांची बदनामी होत आहे. त्यांना पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे माझी मुलगी निलोफरने देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा: गुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -