मी सीडी बाहेर काढली तर भाजपला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; नवाब मलिकांचा इशारा

Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January
Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत याची माहिती माझ्याकडे आहे. जर ती सीडी मी काढली तर त्यांचं काय होईल हे त्यांना माहित आहे. माझ्याकडे जी सीडी आहे ती मी बाहेर काढली तर भाजपवाले लोकांसमोर तोंड दाखवू शकणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रवादीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला होता. यावर बोलताना नवाब मलिक यांनी हा इसारा दिला आहे. “कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस… हे सरकार अंडरवर्ल्डशी संबंध ठेवून हे सरकार चालवत आहेत असं म्हणतायत. कुठल्या अंडरवर्ल्डशी या लोकांचे संबंध आहेत याची माहिती माझ्याकडे आहे. हे या लोकांना माहिती आहे. ती सीडी मी काढली तर यांचं काय होईल यांना माहित आहे. आमचे खडसे साहेब सांगत होते, सीडी आणतो…सीडी आणतो…माझ्याकडे जी सीडी आहे ती मी बाहेर काढल्यानंतर लोकांसमोर हे तोंड दाखवू शकत नाहीत अशी पण प्रकरणं आमच्याकडे आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.

ईडीचा भांडाफोड करणार

“केंद्र सरकारने समजून जावं…आता एनसीबी आहे, पुढच्या वेळेस ईडीचा भांडाफोड करणार. रोज भाजपचा एक नेता हा घोटाळा…तो घोटाळा…त्याचा पण काही दिवसात एक घोटाळा काढू आणि जनतेच्या समोर आणू,” असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे घोटाळे काढणार

“सुरुवातीला भाजपचे नेते होते…चंद्रकांत पाटलांना बोलले नवाब मलिक यांच्याबद्दल बोला. माझ्या खिशात ठेवतो. मी ते व्हिडिओ पाहिल्यानंतर बोललो तुमचा खिसा एवढा मोठा झालेला आहे. मला टाका आतमध्ये…काय आहे बघू आणि लोकांना सांगू. काही लोकांनी मंदिराच्या जागा विकलेल्या आहेत. त्यांचे पण घोटाळे बाहेर काढू. निश्चितरुपाने भविष्यात ते घोटाळे बाहेर काढण्याचे काम करु,” असं नवाब मलिक म्हणाले.


हेही वाचा – ‘जे स्वत:ला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब हेच चाणक्य आहेत’ – नवाब मलिक