परमबीर सिंहांनी गुन्हा केला असल्यास त्यांना शिक्षा होणार, नवाब मलिकांचे वक्तव्य

nawab malik claim if parambir singh found guilty police will take action
परमबीर सिंहांनी गुन्हा केला असल्यास त्यांना शिक्षा होणार, नवाब मलिकांचे वक्तव्य

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते. अखेर बुधवारी परमबीर सिंह यांचा मोबाईल चालु झाला आणि आता मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार घोषित केल्यावर ते समोर आले आहेत. त्यांना अटकेची भीती वाटायला लागल्यामुळे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु परमबीर सिंह यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होणारच असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. परमबीर सिंह हे फरार घोषित आहेत. त्यांच्याविरोधात राज्य सरकार आणि मुंबई पोलीस न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे मलिकांनी सांगितले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. यावर त्यांनी म्हटलं आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ज्यांची बदली होमगार्डमध्ये करण्यात आली होती. बदलीनंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० करोड खंडणी गोळा करण्यासाठी सांगितले असल्याचा खोटा आरोप केला आहे. असे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान नवाब मलिक यांनी पुढे म्हटलं आहे की, आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. चांदीवाल कमिशन गठीत करण्यात आले. चौकशी सुरु केली. कोर्टात गेल्यावर सीबीआयकडे हा तपास केला पाहिजे यानुसार सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुखांना सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली. परंतु अजूनही वाझे, सीबीआय, परमबीर सिंह यांच्याकडून कोणताही पुरवा देण्यात आला नाही. राजकीय हेतुने ही कारवाई झाली आहे. निश्चितरुपाने देशमुख न्यायालयीन लढा लढणार आहेत असे नवाब मलिक यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई होणार

परमबीर सिंह मे महिन्यापासून फरार होते. पोलीसांकडून त्यांना फरार घोषित केले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले माझ्या जिवाला धोका आहे. मला अटक होऊ शकते. असे त्यांनी सांगितले आहे. परंतु जे मुंबईचे पोलीस आयुक्त राहिले आहेत त्यांनी असे म्हटले याचे आम्हाला आश्चर्य वाटते असे नवाब मलिक म्हणाले आहेत. निश्चितरुपाणे सिंह यांच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. यातील ४ गुन्हे खंडणीचे आहेत. तर एक गुन्हा कनिष्ठ अधिकाऱ्याला फसवण्याचा आहे.

देशाच्या कायद्यामध्ये कोणलाही कुठलेही संरक्षण नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. न्यायालयीन लढा राज्य सरकार आणि पोलीस लढतील, पोलीस कोणावरही अन्याय करणार नाही परंतु गुन्हा असेल तर कारवाई होणार असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.


हेही वाचा : अंत्य संस्कारासाठी हिंदू, सरकारी नोंदी मुस्लिम, नवाब मलिकांचे ट्विट