Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला पक्षांतर्गत चर्चेनंतर पाठिंबा : नवाब मलिक

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पक्षांतर्गत चर्चेनंतर पाठिंबा : नवाब मलिक

सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण एकही पाऊल मागे घेणार नाही ही केंद्राची भूमिका राहिल्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे,

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहे. केंद्र सरकारला वाटत असेल की शेतकरी थकेल परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपुर्ण पाठिंबा आहे. मात्र शेतकऱ्यांनी भारत बंदे आवाहन केलं आहे. या भारत बंदला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या सोयीचा कायदा पुन्हा आणावा असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शेतकरी आंदोलना पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भारत बंदला पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर पाठिंबा देण्यात येईल असे म्हटलं आहे. केंद्र सरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही केंद्राची चूक आहे. शेतकरी कधीही थकणार नाही. त्यामुळे वेळ गेलेली नाही. चर्चा करा आणि कायदे रद्द करा, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, जे शेतकरी आंदोलन देशात सुरु आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहने केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासून आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या भारतबंद आंदोलनाबाबत पक्षात चर्चा करुन पाठिंबा देण्यात येईल. सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन एखादा नवीन कायदा लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण एकही पाऊल मागे घेणार नाही ही केंद्राची भूमिका राहिल्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे, सरकारला वाटत असेल हे शेतकरी थकतील मात्र हि सरकारची चूकभूल आहे. शेतकरी थकणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन नवीन कृषी कायदा करावा असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे लवकरच पुनर्गठन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


 

- Advertisement -