घरताज्या घडामोडीविना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करा, रामदेवबाबाच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांचा हल्लाबोल

विना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करा, रामदेवबाबाच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांचा हल्लाबोल

Subscribe

अविश्वास...अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक

अॅलोपॅथी डॉक्टरांच्या उपचारपद्धतीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या आहेत. रामदेव बाबांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलंय.

दरम्यान रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देवू शकतात मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

रामदेवबाबा डॉक्टर नाही. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास…अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक आहे असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात त्यापेक्षा दुर्दैवी घटना होवू शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यसरकार बारावीच्या बोर्डच्याबाबतीत निर्णय घेईल 

पंतप्रधानांनी सीबीएसईच्याबाबतीत निर्णय घेतला आहे परंतु राज्यसरकार बारावीच्या स्टेट बोर्डच्या बाबतीत सखोल अभ्यास करून निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. घोषणा करणे आणि त्या घोषणेनंतर काय पर्याय उपलब्ध आहेत याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्यसरकार निर्णय घेईल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -