Nawab Malik Arrested : काही सुपरहिरो टोपी घालत नाहीत, म्हणून त्यांना…; वडिलांच्या समर्थनार्थ निलोफर खानचे ट्विट

nawab malik daughter nilofer malik shaikh first reaction of father nawab malik after his arrest
Nawab Malik Arrested : काही सुपरहिरो टोपी घालत नाहीत, म्हणून त्यांना...; वडिलांच्या समर्थनार्थ निलोफर खानचे ट्विट

आठ तासांच्या चौकशीनंतर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीने आज सकाळी 5 वाजता मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता त्यांची मुलगी निलोफर मलिक शेख हीने त्यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, काही सुपरहिरो टोपी घालत नाहीत, म्हणून त्यांना वडील म्हणतात.

नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यलयाबाहेर जमले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिकांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे. मंत्री नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झाले आहेत. इक्बाल कासकर सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी ईडीने हसिना पारकर यांच्या मुलाचीही चौकशी केली आहे.

ईडीने केलेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी “लडेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे” असं म्हटलंय. दरम्यान नवाब मलिक यांच्यावर प्रीवेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग एक्ट 2002च्या अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जातेय. ईडीचे अधिकारी ईडीचे अधिकारी नीरज कुमार यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. मात्र मलिकांच्या अटकेनंतर आता राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.

भाजपकडून आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ईडीने 15 फेब्रुवारीला मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्डच्या कारवाया पाहता ईडीने अनेक ठिकाणी ही छापेमारी केली होती. या छापेमारीच्या यादीत दाऊदची बहीण हसिना पारकर हिचा ठावठिकाणांचाही समावेश होता. त्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली होती. यानंतर तपासात असे समोर आले की, नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमचा जवळचा व्यक्ती सरदार शाहवली खान आणि हसीना पारकरचा बॉडीगार्ड अंगरक्षक सलीम फ्रूट यांच्याशी डील केल्याचे समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवाब मलिक यांनी खान आणि फ्रूट यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अवघ्या 30 लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला होता.


नवाब मलिक अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना फोन, सायंकाळी वर्षावर खलबतं