घरमहाराष्ट्रNawab Malik : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा अभ्यास करणं गरजेचं; जयंत पाटील...

Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा अभ्यास करणं गरजेचं; जयंत पाटील यांचा टोला

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अजित पवार गटात (Ajit Pawar Group) सहभागी होत असल्याची भूमिका जाहीर करून ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नवाब मलिकांचं स्वागत करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र नवाब मलिक प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेरल्याचे आज सभागृहात दिसून आले. यानंतर आता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पत्र पोस्ट करत म्हटले की, नवाब मलिक यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप त्यांना सध्या महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. फडणवीसांच्या या ट्वीटनंतर अजित पवार गट काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. (Nawab Malik Devendra Fadnavis letter should be studied Jayant Patil)

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल; फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादीची भूमिका

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एका उपमुख्यमंत्र्याकडे बहुतेक दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा फोन नंबर नाही आहे. कारण असे प्रश्न फोनवरून सांगायला पाहिजेत, त्यासाठी पत्र लिहिणं हे एक आश्चर्य आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना फोन करून ही माहिती देऊ शकले असते, पण त्यांनी ट्वीट करण्याला जास्त प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ट्वीट केलेलं पत्र हे एका उपमुख्यमंत्र्याचे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आहे की, आपली बाजू स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणजेच आम्ही त्यातले नाही, हे सांगण्यासाठी आहे, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं तर नवाब मलिक यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची अडचण झाली आहे, असे एकंदरीत दिसते आहे. त्यामुळे आपली बाजू साफ ठेवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाने या पत्राद्वारे केला आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादीचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपाच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. त्यामुळे आमच्याकडून नवाब मलिक यांचा सन्मान होईल. ते माझ्यासाठी आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि सुप्रिया सुळे नेहमी सत्याच्या बाजूने असते. छगन भुजबळ अडचणीत असताना मी जेलमध्ये गेले होते. परंतु जे कोणी जेलमध्ये गेले ते राजकीय बळी म्हणून गेले आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत, पण ते दूर्देवी आहेत. नवाब मलिक यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आहे. अजित पवार गट वेगळा झाला आहे. ते नवाब मलिक यांना तसे वागवत असतील तर योग्य नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्ष शरद पवार आहेत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Pravin Darekar : रोहित पवारांना सुनावताना दरेकरांनी केला ‘काका’चा उल्लेख; नेमका रोख कोणाकडे?

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात काय म्हटले?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालो तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणान्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे. असे लिहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -