घरताज्या घडामोडीDrug Case : फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा...

Drug Case : फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

Subscribe

नवाब मलिक यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ड्रग्जचा खेळ हा फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच आणि देखरेखीखाली राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. या ड्रग्ज कनेक्शनची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्याला ड्रग्ज पेडलरने फायनान्स केला असल्याचाही गंभीर आरोप नवाब मलिक यांना माध्यमांशी बोलताना केला.

- Advertisement -

काशिद खानसारख्या मोठ्या ड्रग्ज पेडलरला सोडून देण्यात येते. ऋषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभाला सोडण्यात येते. सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यात सुरू आहे. अतिशय जबाबदारीने सांगतो की, प्रतिक गाभा कोण आहे ? प्रतिक गाभा कोणकोणत्या शहरात आणि हॉटेलमध्ये पार्टी ऑर्गनाईज करतो ? एक टेबलची किंमत ही ५ लाख ते १५ लाख कशी होते ? या खेळात प्रतिक गाभा सर्वात मोठे कॅरेक्टर आहे. त्याला आगामी काळात आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. संपुर्ण ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाइंड हे राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आहेत का ? असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो आहे.

भाजपच्या लोकांना पार्टीतील कारवाई दरम्यान का सोडले जाते ? आम्हाला माहित नव्हत असा खुलासा भाजपचे लोक करतात. पण तुमच्याच डोळ्याखाली ड्रग्जचा धंदा होत होता असेही नवाब मलिक म्हणाले. येत्या काळात आणखी असे फोटो आम्ही समोर आणणार आहोत, जे ड्रग्ज पेडलर आहेत आणि भाजपमध्ये होते आणि आहेत. हे सगळ्या गोष्टी आम्ही येत्या दिवसांमध्ये उघडकीस आणणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणातच राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू आहे, असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. फडणवीस हेच राज्यात ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

ड्रग्ज पेडलर फायनान्स हेड कसा ?

अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्यावरही नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या गाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील झळकले होते. या गाण्याला ड्रग्ज पेडलर असलेला जयदीप राणा हा कसा काय फायनान्स हेड असू शकतो ? असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे. हे गाणे अमृता फडणवीस यांनी गायिले होते. तर अनेक राजकारण्यांनीही या गाण्यात काम केले होते. या गाण्याच्या फायनान्सला प्रश्न विचारत नवाब मलिक यांनी मोठे आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत. राज्यात सर्व ड्रग्जचे धंदे हे फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू असून या प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशीही झाली पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.


हेही वाचा – drug case : ड्रग्ज पेडलर जयदीप राणा अमृता फडणवीसांच्या गाण्याचा फायनान्स हेड कसा? नवाब मलिकांचा भाजपला सवाल

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -