वानखेडे कुटुंबीयांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करणार नाही, नवाब मलिकांची कोर्टात हमी

nawab malik gave assurance no comments and post publish against sameer wankhede in court
वानखेडे कुटुंबीयांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करणार नाही, नवाब मलिकांची कोर्टात हमी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने वानखेडे कुटुंबियांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवाब मलिकांना वानखेडेंच्या परिवाराविरोधात कोणतीही टीका आणि वक्तव्य करता येणार नाही असे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतंही वक्तव्य करण्यात येणार नाही अशी हमी देखील नवाब मलिकांच्या वकिलांमार्फत कोर्टात देण्यात आली आहे. त्यामुळे वानखेडेंच्या कुटुंबाला हा मोठा दिलासा मानला जात आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. नवाब मलिकांना कुटुंबीयांविरोधात आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिकेमध्ये केली होती. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली यावेळी न्यायालयाने नवाब मलिकांना चांगलाच दणका दिला आहे. आता नवाब मलिक वानखेडेंच्या विरोधात कोणतंही वक्तव्य करु शकत नाहीत.

हायकोर्टात सुनावणी करताना नवाब मलिकांचे वकिल आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. नवाब मलिकांच्या बहिणीला लेडी डॉन संबोधण्यावरुनही न्यायलयात युक्तीवाद झाला यावर नवाब मलिकांच्या वकिलांनी बाजू मांडताना फ्लेचर पटेल नावाच्या एका व्यक्तीनेच असे म्हटलं असल्याचे सांगितेल आहे. न्यायालयाने यावर स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, जोपर्यंत सुनावणी सुरु असेल तोपर्यंत परिवाराविरोधात कोणताही आरोप करण्यात येणार नाही. न्यायाधीश काथावाला यांनी नवाब मलिकांच्या वकिलांना विचारले की, नवाब मलिक कोणतंही वक्तव्य करणार नाहीत? यावर वकिलांनी वानखेडेंच्या कुटुंबाविरोधात कोणतंही वक्तव्य करण्यात येणार नाही असे सांगितले आहे. तसेच कोणतीही पोस्ट शेअर करण्यात येणार नाही अशी माहिती कोर्टाला दिली आहे.

मलिकांना घोषणाबाजी शोभत नाही 

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी नवाब मलिकांना अशी घोषणाबाजी शोभत नाही असे वक्तव्य केलं आहे. जस्टिस जाधव यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिक व्हिआयपी व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना सहज कागदपत्रे मिळत आहेत. तर जस्टिस काथावाला यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिक एक मंत्री आहेत त्यांना असे वक्तव्य शोभतं का?


हेही वाचा : अंत्य संस्कारासाठी हिंदू, सरकारी नोंदी मुस्लिम, नवाब मलिकांचे ट्विट