मलिकांना मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाचा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

एनसीबी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात गेल्या वर्षी धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या मागे भाजपचा हात आहे. भाजपच्या सांगण्यानुसार एनसीबी अधिकारी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

Nawab malik get relief second time in mohit bharatiya defamation case
मलिकांना मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाचा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी न्यालयाकडून आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीची तक्रार केली होती. या तक्रारीच्या सुनावणीवेळी मलिकांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय आणि माहितीची सत्यता न पडताळता पदाचा बदनामी केली आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी आपल्या तक्रारीत केला होता. नवाब मलिकांनी दुसऱ्यांदा कोर्टात जामीन मागितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते मोहित भारतीय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये कोर्टात जामीन मागितला होता. जामीन मिळाल्यानंतर कोर्टाच्या बाहेर आल्यावर मोहित भारतीय यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचा आरोप केला. यामुळे भारतीय यांच्याकडून मलिकांना डिसेंबर २०२१ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मलिकांनी बदनामी करणारं वक्तव्य केले असल्याचे त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोहित भारतीय यांच्या वकिलांनी कोर्टात मलिकांनी जामीन मिळाल्यावर पुन्हा बदनामी केली असल्याची माहिती दिली होती. नवाब मलिकांनी दुसऱ्यांदा कोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. नवाब मलिकांना न्यायाधीश मोकाशी यांनी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. भविष्यात असे वक्तव्य करु नये असे निर्देश न्यायालयाने नवाब मलिकांना दिले आहेत.

एनसीबी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात गेल्या वर्षी धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या मागे भाजपचा हात आहे. भाजपच्या सांगण्यानुसार एनसीबी अधिकारी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रुझवर केलेली कारवाई भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याचा आरोप मलिकांनी केला. यामध्ये त्यांनी भाजप नेते मोहित भारतीय यांचे नाव घेतले होते. मोहित भारतीय यांनी मलिकांविरोधात मानहानीचा दावा केला होता.


हेही वाचा : मनसेला मोठा धक्का, विदर्भातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर