घरताज्या घडामोडीसर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवणार नाही पण आम्हाला स्वतंत्र ॲप द्या, नवाब मलिक...

सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवणार नाही पण आम्हाला स्वतंत्र ॲप द्या, नवाब मलिक यांचा टोला

Subscribe

केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मोठ्या जलदगतीने कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. परंतु कोरोना लसीकरणात तांत्रिक अडथळे येत असून केंद्राकडून लस पुरवठा अपुरा होत असल्याचे महाविकास आघाडी नेत्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या को-विन अॅप पोर्टलवर तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे राज्यासाठी वेगळा स्वतंत्र अॅप तयार करुन देण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल असे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रसरकारने ही परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्रसरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

मुंबईत मॉडर्ना लसीचे डोस कसे दिले जातात

देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -